टाइम्स मराठी | सोमवारी देशामध्ये ग्रीन हायड्रोजन उत्पादन वाहनाला वापरण्यासाठी मंत्रालयाने पुढाकार घेतला. या वाहनाला प्रोत्साहन म्हणून केंद्रीय पेट्रोलियम, नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी दिल्लीमध्ये पहिल्या ग्रीन हायड्रोजन इंधन सेल बसचे लॉन्चिंग केले. याबाबत हार्दिकसिंह पुरी यांनी ट्विटरच्या माध्यमातून व्हिडिओ शेअर करत माहिती दिली.
इंडियन ऑइलने दिल्ली, हरियाणा आणि उत्तर प्रदेश या ठिकाणी काही रस्त्यांवर ग्रीन हायड्रोजन इंधनावर चालणाऱ्या 15 इंधन सेल बसेसची चाचणी सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यानुसार दिल्लीच्या इंडिया गेट वरून सर्वात आधी 2 फ्युएल सेल बस सुरू करण्यात येत आहेत. त्यासाठी इंडियन ऑइलने R AND D फरीदाबाद परिसरामध्ये अत्याधुनिक वितरण सुविधा देखील प्रस्थापित केली आहे. ही सुविधा सौरपीव्ही पॅनल वापरून इलेक्ट्रोलिसीस मधून तयार केलेले ग्रीन हायड्रोजन इंधन देऊ शकते.
यावेळी हरदीप सिंह पुरी म्हणाले की, भविष्यातील इंधन म्हणून हायड्रोजन उपयोगात येणार आहे. त्याचबरोबर भारताला डीकार्बोनयझेशन उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आणि स्वच्छ ऊर्जेची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी हायड्रोजन मदत करेल. त्याचबरोबर सरकार लवकरच दिल्ली एनसीआर क्षेत्रामध्ये 15 आणि फ्युल सेल बस लॉन्च करण्याची योजना आखत आहे. हायड्रोजन मुळे भारताला डी कार्बोनैझेशन टार्गेट पूर्ण करण्यासाठी मदत होईल आणि 2050 पर्यंत हायड्रोजन ची मागणी 4 ते 7 टक्के वाढेल. त्याचबरोबर भारतीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमाच्या माध्यमातून पेट्रोलियम मंत्रालय 2030 पर्यंत 1 MMTPA ग्रीन हायड्रोजन उत्पादन करण्यास सक्षम असेल. ग्रीन हायड्रोजन वर चालणाऱ्या बस शहरी वाहतुकीचा कायापालट करणार आहे. असं देखील मंत्री हरदीप सिंह पुरी म्हणाले.
दरम्यान, ग्रीन हायड्रोजन बस शून्य उत्सर्जन वाहन आहे. हे ग्रीन हायड्रोजन हवेचा आणि हायड्रोजनचा वापर करून बस चालवण्यासाठी वीज निर्माण करते. आणि पाणी उत्सर्जित करते. या हायड्रोजनचा वापर बस मध्ये इंधन म्हणून केला जाऊ शकतो. इंधन सेल वाहनांमध्ये बॅटरी वाहनांपेक्षा जास्त इंधन क्षमता असते. म्हणजेच या बस मध्ये जास्त इंधन भरण्याची गरज भासत नाही. कमी इंधनांमध्ये देखील बस लांबचा पल्ला गाठू शकते.