Flipkart Big Billion Days 2023 : या मोबाईलवर बंपर सूट; संधी सोडू नका

टाइम्स मराठी । उद्या म्हणजेच ८ ऑक्टोबरपासून फ्लिपकार्टचा बिग बिलियन डेज सेल (Flipkart Big Billion Days 2023) सुरू होणार आहे. हा या वर्षीचा सर्वात मोठा सेल असून यामध्ये बऱ्याच वस्तूंवर बंपर डिस्काउंट देण्यात येणार आहे. त्यानुसार ऑगस्ट महिन्यामध्ये भारतात लॉन्च झालेला Poco M6 pro 5G या स्मार्टफोनवर फ्लिपकार्टच्या बिग बिलियन डेज सेलमध्ये मोठ्या प्रमाणात सूट मिळत असून तुम्ही अगदी कमी किमतीत हा मोबाईल खरेदी करू शकता. एवढेच नाही तर Poco प्रमाणेच बऱ्याच स्मार्टफोनवर देखील या सेलमध्ये डिस्काउंट ऑफर देण्यात येत आहे. नेमकी ही ऑफर काय आहे हे आज आपण जाणून घेऊयात.

   

Flipkart Big Billion Days 2023 या सेलमध्ये Poco M6 Pro 5G च्या 4 GB रॅम आणि 64 GB स्टोरेज व्हेरीएंट असलेल्या स्मार्टफोनवर डिस्काउंट ऑफर देण्यात येणार आहे. या स्टोरेज व्हेरीएंटची किंमत 10,999 एवढी आहे. परंतु तुम्ही डिस्काउंट ऑफरनुसार 8999 मध्ये हा स्मार्टफोन फ्लिपकार्टचा बिग बिलियन डेज सेल मध्ये खरेदी करू शकतात. यासोबतच 1500 रुपयांच्या महिन्याच्या EMI वर देखील तुम्ही हा स्मार्टफोन खरेदी करू शकतात. यासोबतच या बिग बिलियन डेज सेलमध्ये एक्सचेंज ऑफर आणि बँक ऑफर देखील उपलब्ध आहेत.

स्पेसिफिकेशन

Poco M6 Pro 5G या स्मार्टफोन मध्ये देण्यात आलेल्या स्पेसिफिकेशन बद्दल बोलायचं झालं तर यामध्ये 6.79 इंच फुल एचडी प्लस डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 90 hz रिफ्रेश रेट आणि 240 hz टच सँपलिंग रेट देण्यात आलाय. हा स्मार्टफोन गोरीला ग्लास 3 ने प्रोटेक्ट करण्यात आला आहे. एवढेच नाही तर या मोबाईल मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 4 Gen 2 प्रोसेसर देण्यात आला आहे.

कॅमेरा– Flipkart Big Billion Days 2023

मोबाईलच्या कॅमेरा बाबत सांगायचं झाल्यास, Poco M6 Pro 5G या स्मार्टफोनमध्ये प्रायमरी कॅमेरा 50 मेगापिक्सेल, दोन मेगापिक्सेल सेकंडरी कॅमेरा, आणि समोरील बाजूला आठ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. या स्मार्टफोनच्या स्टोरेज बद्दल बोलायचं झालं तर यामध्ये 6 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटर्नल स्टोरेज उपलब्ध करण्यात आले आहे. मोबाईल मध्ये कंपनीने 5000 mAh बॅटरी दिली असून असून ही बॅटरी 18 W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

कलर ऑप्शन आणि सिक्युरिटी फीचर्स

Poco M6 Pro 5G या स्मार्टफोन मध्ये सिक्युरिटी साठी फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आले आहे. एवढेच नाही तर या मोबाईलला डस्ट आणि स्प्लैश रजिस्टेंससाठी IP53 रेटिंग देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन फॉरेस्ट ग्रीन आणि कस्टमर ब्लॅक या दोन कलर ऑप्शन मध्ये उपलब्ध करण्यात आला आहे.