Flipkart Big Billion Days 2023 : 200 MP कॅमेरावाल्या Mobile वर मिळतोय 25000 पर्यंत डिस्काउंट

Flipkart Big Billion Days 2023 : फ्लिपकार्टवरील बिग बिलियन डेज सेलचा आज शेवटचा दिवस आहे. Flipkart च्या या सेल मध्ये मोबाइल, टीव्ही, लॅपटॉप तसेच फॅशन रिलेटेड वस्तूंवर बम्पर सूट देण्यात आली आहे. आज या सेलचा शेवटचा दिवस असून तुम्ही जर नवीन मोबाईल खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुमच्यासाठी अतिशय जबरदस्त मोबाईल आणि त्यावरील ऑफर घेऊन आलो आहोत. Flipkart सेल मध्ये Motorola Edge 30 Ultra वर तब्बल 25000 रुपयांपर्यंत डिस्काउंट ऑफर देण्यात आली आहे.

   

काय आहे ऑफर ?

Motorola Edge 30 Ultra हा 74,999 रुपये किंमत असलेला मोबाईल फ्लिपकार्टच्या बिग बिलियन डेज सेलमध्ये 49,999 मध्ये मिळत आहे. या स्मार्टफोनवर कंपनीने बँक ऑफर आणि एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध केले आहेत. या मोबाईल वरील बँक ऑफरनुसार तुम्हाला 1000 रुपयांचा डिस्काउंट देण्यात येणार आहे. जर तुम्ही एक्सचेंज ऑफरच्या माध्यमातून हा स्मार्टफोन खरेदी करणार असाल तर तुम्हाला 46,150 रुपयांचा फायदा होईल.

स्पेसिफिकेशन– Flipkart Big Billion Days 2023

Motorola Edge 30 Ultra या स्मार्टफोनमध्ये 144 hz रिफ्रेश रेटसह 6.67 इंच चा डिस्प्ले देण्यात आला आहे. मोबाईलचा टच सँपरिंग रेट 360 hz एवढा असून हा डिस्प्ले 1250 निट्स पीक ब्राईटनेस प्रदान करतो. या मोबाईलमध्ये कंपनीने स्नॅपड्रॅगन 8 + जेन 1 प्रोसेसर दिला असून 4610 mAh बॅटरी यामध्ये तुम्हाला मिळेल. ही बॅटरी 125 W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

कॅमेरा

Motorola Edge 30 Ultra मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा उपलब्ध करण्यात आला आहे. त्यानुसार प्रायमरी कॅमेरा 200 मेगापिक्सेल, अल्ट्राव्हाइड अँगल कॅमेरा 50 मेगापिक्सेल, टेलीफोटो लेंस 12 मेगापिक्सेल आणि समोरील बाजूला 60 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. मोबाईल मध्ये तुम्हाला 12 GB रॅम आणि 256 GB इंटरनल स्टोरेज मिळते.

कनेक्टिव्हिटी फीचर्स

Motorola Edge 30 Ultra मध्ये कंपनीने इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर उपलब्ध केले आहे. यासोबतच 50 W वायरलेस फास्ट चार्जिंगला देखील हा स्मार्टफोन सपोर्ट करतो. कंपनीने हा मोबाईल इंटरस्टेलर ब्लॅक आणि स्टारलाईट व्हाईट कलर मध्ये उपलब्ध केला आहे. तुम्ही हा स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर फ्लिपकार्टच्या बिग बिलियन डेज सेलच्या आजच्या या शेवटच्या दिवसाचा लाभ घेऊन कमी किमतीमध्ये खरेदी करू शकतात.