Flipkart Big Billion Days 2023 : फ्लिपकार्टवर सुरु होतोय सर्वात मोठा सेल; या वस्तूंवर बंपर सूट

Flipkart Big Billion Days 2023 : प्रसिद्ध ई-कॉमर्स आणि शॉपिंग वेबसाईट Flipkart वर लवकरच बिग बिलियन डेज सेल सुरू होणार आहे. फ्लिपकार्ट वरील हा बिग बिलियन डेज सेल वर्षामधील सर्वात मोठा सेल आहे. त्यासाठी कंपनीने मायक्रोसाईटला लाईव्ह केले आहे. या मायक्रोसाईडच्या मोबाईल ऑफरवर लिहिण्यात आलेलं आहे की, यंदा सर्वात कमी किमतीमध्ये हा मोबाईल उपलब्ध करण्यात येईल. या सेलमध्ये बऱ्याच बँक ऑफर आणि डिस्काउंट देण्यात येणार आहे. हा सेल 3 ऑक्टोंबर ते 10 ऑक्टोंबर दरम्यान सुरू असणार आहे.

   

इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर मिळणार मोठा डिस्काउंट – Flipkart Big Billion Days 2023

फ्लिपकार्ट वर सुरू होत असलेल्या या बिग बिलियन डेज सेल मध्ये सॅमसंग, एप्पल आयफोन, रियलमी, पोको या स्मार्टफोनवर काही स्पेशल ऑफर देण्यात येणार आहे. याबद्दल आणखीन खुलासा एक ऑक्टोबरला होऊ शकतो. परंतु हाती आलेल्या माहितीनुसार , या बिग बिलियन डेज सेलमध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि टीव्ही ॲक्सेसरीजवर मोठ्या प्रमाणात सूट देण्यात येणार आहे.

80 % पर्यंत मिळणार सूट

Flipkart Big Billion Days 2023 मध्ये ग्राहकांना इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि ॲक्सेसरीजवर 50 ते 80 टक्के डिस्काउंट मिळणार आहे. त्याचबरोबर बेस्ट सेलिंग टॅबलेट वर 70% इंक टॅंक प्रिंटर वर 60 टक्के डिस्काउंट आणि लॅपटॉप वर देखील मोठ्या प्रमाणात सूट देण्यात येणार आहे. एवढेच नाही तर कीबोर्ड यासारखे प्रॉडक्ट ग्राहक 99 रुपयांच्या किमतीमध्ये खरेदी करू शकतील.

TV आणि अप्लायन्सवर 80% डिस्काउंट-

Flipkart Big Billion Days 2023 सेल मध्ये टीव्ही आणि अप्लायन्सवर ग्राहकांना 80% डिस्काउंट मिळणार आहे. यासोबतच AC वर देखील प्रचंड सूट मिळणार असल्याचं सांगण्यात येत आहे. जर तुम्ही या सेलच्या माध्यमातून AC खरेदी करू इच्छित असाल तर तुम्ही 2,999 च्या सुरुवातीच्या किमतीत खरेदी करू शकतात. आणि वॉशिंग मशीन 4990 रुपयांच्या सुरुवाती किमतीमध्ये खरेदी करू शकतात.

याव्यतिरिक्त या सेल च्या माध्यमातून ब्रेकफास्ट अप्लायन्सवर 75% पर्यंत सूट देण्यात येणार आहे. त्याचबरोबर किचन अप्लायन्स तुम्ही 299 च्या सुरुवाती किमतीमध्ये खरेदी करू शकतात. ग्राहक या सेलमध्ये फ्लिपकार्टच्या ओरिजनल्स वर 60 टक्के सूट मिळवू शकतात. यासोबतच एनर्जी एफिशिंएन्ट एसी ग्राहक 23 हजार 999 च्या सुरुवाती किमतीमध्ये खरेदी करू शकतात. या अपकमिंग बिग बिलियन डेज सेलमध्ये फॅशन रिलेटेड गोष्टींमध्ये ग्राहकांना 60 ते 90 टक्के डिस्काउंट देण्यात येणार आहे. यामध्ये कपडे शूज ज्वेलरी या गोष्टींवर मोठ्या प्रमाणात डिस्काउंट ऑफर करण्यात येणार आहे. या सेलमध्ये मोटोरोला साऊंडबार 3799 रुपयांच्या सुरुवाती किमतीमध्ये खरेदी करता येऊ शकतात.