Flipkart Big Billion Days Sale : फक्त 6299 रुपयांत हा Smart TV; तुम्हीही घ्या लाभ

टाइम्स मराठी । फेस्टिवल सिझन सुरू होण्यापूर्वीच बऱ्याच कंपन्यांनी त्यांच्या प्रॉडक्ट वर डिस्काउंट ऑफर देण्यास सुरुवात केली आहे.  त्यातच Flipkart आणि Amazon या ई-कॉमर्स आणि शॉपिंग वेबसाईटवर देखील सेल सुरू झाला आहे. यातील Flipkart Big Billion Days Sale मध्ये तुम्ही अवघ्या 6299 रुपयांत Smart TV खरेदी करू शकता. Blaupunkt नावाच्या या Smart TV वर कंपनी तब्बल 80% पर्यंत डिस्काउंट ऑफर देत आहे. तसेच याव्यतिरिक्त, Blaupunkt त्याच्या नवीन 43-इंच QLED आणि 55-इंच 4K GTV वर सुद्धा बंपर सूट देण्यात येतेय. त्यामुळे तुम्हीही या संधीचा लाभ घ्या.

   

Flipkart चा हा बिग बिलियन डेज सेल देखील 8 ऑक्टोंबर पासून 16 ऑक्टोंबर पर्यंत सुरू असणार आहे. या सेलमध्ये ब्रँडेड स्मार्ट टीव्हीवर 80% पर्यंत डिस्काउंट ऑफर देण्यात येणार आहे. त्यानुसार तुम्ही देखील फेस्टिवल सीझनमध्ये टीव्ही किंवा कोणतेही प्रॉडक्ट खरेदी करण्याचा विचार करत असाल तर फ्लिपकार्टच्या या सेलचा लाभ घेऊ शकतात. या सेलमध्ये Blaupunkt या पॉप्युलर ब्रँडचे स्मार्ट टीव्ही 6299 मध्ये मिळत आहेत. यासोबतच या ब्रँडच्या बऱ्याच स्मार्ट टीव्हीवर बंपर डिस्काउंट देखील देण्यात येत आहे. त्याचबरोबर बँक ऑफर देखील यामध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. त्यानुसार Axis, ICICI , कोटक बँकेच्या कार्डधारकांना 10% इन्स्टंट डिस्काउंट सुद्धा मिळणार आहे. यासाठी  Blaupunkt या पॉप्युलर ब्रँड ने डिज्नी प्लस, हॉटस्टार यांच्यासोबत अपकमिंग क्रिकेट वर्ल्ड कप साठी पार्टनरशिप केली आहे.

43 इंच QLED TV –

Blaupunkt या पॉप्युलर ब्रँड ने नवीन लॉन्च केलेला स्मार्ट टीव्ही देखील या सेलमध्ये विक्रीसाठी उपलब्ध करण्यात येणार आहे. या टीव्ही मध्ये 43 इंच QLED 4k डिस्प्ले देण्यात आला आहे. हा टीव्ही डॉल्बी व्हिजन आणि  HDR 10 + ला सपोर्ट करतो. या TV मध्ये 50W स्पीकर उपलब्ध असून डॉल्बी ऍटमॉस आणि डॉल्बी डिजिटल प्लस सपोर्ट देखील उपलब्ध आहे.  या टीव्हीमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथ 5.0 , ड्युअल ब्रँड वाय-फाय हे फीचर्स मिळतात. त्याचबरोबर या टीव्हीच्या रिमोट मध्ये गुगल असिस्टंटसाठी स्पेशल बटन देण्यात आले आहे. हा TV गुगलच्या OS वर काम करते. या टीव्हीची किंमत  28 हजार 999 रुपये आहे.

55 इंच वाला google TV –

जर तुम्ही मोठा डिस्प्ले असलेला टीव्ही घेऊ इच्छित असाल तर Blaupunkt या पॉप्युलर ब्रँडचा 55 इंच वाला google टीव्ही तुम्ही खरेदी करू शकतात. या टीव्हीची किंमत 34 हजार 999 एवढी आहे. यामध्ये ब्लूटूथ 5.0, ड्युअल बँड वाय-फाय, गुगल असिस्टंट  पावर्ड रिमोट  यासारखे कनेक्टिव्हिटी फीचर्स देण्यात आले आहे. हा TV 1.1 बिलियन कलर्ससह 4K HDR 10+ डिस्प्ले सह सुसज्ज आहे. यामध्ये बेजल लेस डिझाईन, अलोय स्टॅन्ड, डॉल्बी डिजिटल प्लस, नेमॅटिक साऊंड कॉलिटी, डी टी एस टेक्नॉलॉजीसह 60W स्टीरियो बॉक्स स्पीकर सिस्टीम उपलब्ध आहे. या टीव्ही मध्ये इनबिल्ड क्रोम कास्ट, एअर प्ले सपोर्ट  सह 10,000 पेक्षा जास्त ॲप्स उपलब्ध आहे.