Flipkart Big Diwali Sale 2023 : 200 MP कॅमेरा असलेला Mobile फक्त 8599 रुपयात; संधीचा लाभ घ्या

टाइम्स मराठी । सध्या सर्वच ठिकाणी दिवाळी निमित्त खरेदी करणे चालू आहे. दिवाळी हा भारतातील सर्वात मोठा सण म्हणून मनवला जातो. दिवाळी निमित्त वाहन खरेदी करणे किंवा सोने खरेदी करणे याकडे मोठा कल दिसून येतो. त्याचबरोबर बरेच जण दिवाळी निमित्त मोबाईल खरेदी करण्याचा विचार करत असतात. कारण दिवाळीला बऱ्याच प्रोडक्टवर कंपनीकडून डिस्काउंट ऑफर देखील दिल्या जातात. जेणेकरून ग्राहकांची दिवाळी धमाकेदार होते. त्यानुसार यंदा दिवाळीला फोटोग्राफीची आवड असलेल्या व्यक्तींना अप्रतिम कॅमेरा वाला स्मार्टफोन खरेदी करण्याचा चांगला चान्स आहे. कारण Flipkart या ई कॉमर्स  शॉपिंग प्लॅटफॉर्मवर फ्लिपकार्ट बिग दिवाली सेल (Flipkart Big Diwali Sale 2023) सुरू झाला आहे. या सेलमध्ये 200 MP कॅमेरा असलेल्या 5G स्मार्टफोनवर बंपर डिस्काउंट ऑफर देण्यात येत आहे.

   

फ्लिपकार्ट वर सुरू असलेल्या बिग दिवाळी सेलमध्ये 200 MP कॅमेरा असलेल्या  स्मार्टफोनवर डिस्काउंट ऑफर देण्यात येत आहे. हा दमदार कॅमेरा फीचर्स असलेला मोबाईल तुम्हाला 10,000 रुपयांपेक्षाही कमी किमतीमध्ये मिळणार आहे. आम्ही तुम्हाला सांगत आहोत, Realme 11 Pro +5G या स्मार्टफोन बद्दल. हा स्मार्टफोन २ स्टोरेज वेरियंट मध्ये उपलब्ध आहे. फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये  (Flipkart Big Diwali Sale 2023) दोन्ही स्मार्टफोन व्हेरिएंटवर बंपर डिस्काउंट देण्यात येत आहे. जाणून घेऊया काय आहेत या ऑफर.

Realme 11 Pro + 5G, 8GB रॅम व्हेरिएंट ऑफर- Flipkart Big Diwali Sale 2023

Realme 11 Pro + 5G या स्मार्टफोनच्या 8GB रॅम असलेल्या व्हेरिएंट ची किंमत 29,999 रुपये आहे. फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल मध्ये या वेरियंटवर 4000 रुपयांची सूट देण्यात येत आहे. त्यानुसार तुम्ही हा स्मार्टफोन 25,999 मध्ये खरेदी करू शकतात. एवढेच नाही तर या मॉडेल वर 17,250 रुपयांचा एक्सचेंज बोनस देखील देण्यात येत आहे. जर तुम्ही एक्सचेंज बोनस चा लाभ घेत असाल तर तुम्ही हा स्मार्टफोन 10,000 रुपयांपेक्षाही कमी किमतीत म्हणजेच 8,749 रुपयांमध्ये खरेदी करू शकता.

Realme 11 Pro + 5G, 12 GB रॅम व्हेरिएंट ऑफर

Realme 11 Pro + 5G या स्मार्टफोनच्या 12 GB रॅम असलेल्या व्हेरिएंटची किंमत 32,999 रुपये आहे. या व्हेरिएंट वर सेलमध्ये 3000 रुपयांचा डिस्काउंट देण्यात येत आहे. त्यानुसार तुम्ही हा स्मार्टफोन 29,999 रुपयात खरेदी करू शकता. एवढेच नाही तर  या व्हेरिएंट वर फ्लिपकार्ट  21,400 रुपयांचा एक्सचेंज बोनस ऑफर करत आहेत. या एक्सचेंज बोनस चा लाभ घेतल्यास तुम्ही हा स्मार्टफोन 8,599 रुपयांमध्ये मध्ये घरी घेऊन जाऊ शकतात. जाणून घेऊया या स्मार्टफोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन.

स्पेसिफिकेशन

Realme 11 Pro + 5G  या स्मार्टफोनमध्ये 6.72 इंच FHD, 1080 × 2400 पिक्सल रिझोल्युशन असलेला AMOLED डिस्प्ले देण्यात आलेला आहे. हा डिस्प्ले 120 Htz रिफ्रेश रेट सह येतो. या मोबाईल मध्ये मीडियाटेक डायमेंसिमेंटी 7050 प्रोसेसर देण्यात आला आहे. या स्मार्टफोन मध्ये 8GB रॅम आणि 256 GB  इंटरनल स्टोरेज आणि 12 GB रॅम आणि 256 GB इंटरनल स्टोरेज असे २ स्टोरेज व्हेरियेण्ट उपलब्ध आहेत.

कॅमेरा

Realme 11 Pro + 5G या स्मार्टफोनच्या कॅमेरा बद्दल बोलायचं झालं तर यामध्ये ट्रिपल  रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. त्यानुसार प्रायमरी कॅमेरा IOS सपोर्ट सह 200 MP एवढा आहे.  तसेच अल्ट्राव्हाइड अँगल कॅमेरा 8 MP,   2 MP मायक्रो लेंस, 32 MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. या मोबाईल मध्ये 5000 mAh बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 100W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. हा स्मार्टफोन पूर्णपणे चार्ज होण्यासाठी 30 मिनिटे लागतात.