Flipkart Big Diwali Sale 2023 : अगदी स्वस्तात मिळतोय Moto चा मोबाईल; 8 GB रॅम आणि बरंच काही….

Flipkart Big Diwali Sale 2023 । सध्या सर्व ठिकाणी दिवाळीची तयारी सुरू आहे. दिवाळी साठी बरेच जण काही वेगवेगळ्या गोष्टी खरेदी करत असतात. दिवाळी सणानिमित्त अनेक वस्तूंवर कंपन्यांकडू वेगवेगळे ऑफर्स उपलब्ध केले जातात. जेणेकरून दिवाळीमध्ये ग्राहकांना कमी किमतीमध्ये प्रॉडक्ट खरेदी करता येतील. त्याच पार्श्वभूमीवर प्रसिद्ध इ कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टवर आजपासून बिग दिवाळी सेल सुरू झाला असून या सेलमध्ये अनेक वस्तू अगदी स्वस्तात मिळत आहेत. तुम्ही सुद्धा या सेलमध्ये नवीन मोबाईल खरेदी करू इच्छित असाल तर Motorola G54 5G तुमच्यासाठी सर्वोत्तम डील ठरेल. कंपनीने हा स्मार्टफोन दोन स्टोरेज व्हेरियंट मध्ये लॉन्च केला होता. त्यानुसार या दोन्ही स्मार्टफोनच्या किमती देखील वेगवेगळ्या आहेत. आज आपण जाणून घेऊया या मोबाईलवर नेमकी काय ऑफर आहे याबाबत…

   

ऑफर– Flipkart Big Diwali Sale 2023

फ्लिपकार्टच्या बिग दिवाळी सेलमध्ये मोटोरोला कंपनीच्या Motorola G54 5G या स्मार्टफोनवर डिस्काउंट ऑफर देण्यात येत आहे. कंपनीने हा स्मार्टफोन दोन स्टोरेज वेरीएंट मध्ये लॉन्च केला होता. आता या दोन्ही व्हेरिएंट वर डिस्काउंट देण्यात येत असून तुम्ही कमी किमतीमध्ये स्मार्टफोन खरेदी करू शकता. Motorola G54 5G या स्मार्टफोनच्या 8 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 15,999 रुपये होती. फ्लिपकार्ट वर (Flipkart Big Diwali Sale 2023) सुरू असलेल्या सेलमध्ये 2000 रुपयांचा डिस्काउंट देण्यात येत आहे. त्यानुसार तुम्ही हा स्टोरेज व्हेरियंट 13,999 रुपयात खरेदी करू शकता. दुसरीकडे Motorola G54 5G च्या 12 GB रॅम आणि 256 GB स्टोरेज व्हेरीएंटची किंमत 18,999 रुपये आहे. फ्लिपकार्ट वर सुरू असलेल्या बिग दिवाळी सेलमध्ये या व्हेरिएंट वर 3000 रुपयांचा डिस्काउंट देण्यात येत आहे. त्यानुसार तुम्ही ह्या स्मार्टफोन 15,999 रुपयात खरेदी करू शकता.

स्पेसिफिकेशन

Motorola G54 5G या स्मार्टफोन मध्ये 6.5 इंच चा  FHD डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले पंच फोन स्टाईल मध्ये उपलब्ध असून IPS LCD पॅनलवर डेव्हलप करण्यात आला आहे. हा डिस्प्ले 2400 × 1080 पिक्सल रिझोल्युशन आणि 120 hz रिफ्रेश रेट ऑफर करतो. या मोबाईल मध्ये 6 नॅनोमीटर फॅब्रिकेशन्स वर डेव्हलप करण्यात आलेले मीडियाटेक डायमेनसिटी 7020 ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच हा स्मार्टफोन अँड्रॉइड 13 OS वर काम करतो.

कॅमेरा

मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, Motorola G54 5G मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सपोर्ट उपलब्ध आहे. त्यानुसार बॅक पॅनलवर 50 MP प्रायमरी कॅमेरा, 8 MP मायक्रो लेंस, 16 MP फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. या स्मार्टफोनमध्ये 6000 mAh बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 33 W टर्बो चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करते.