Flipkart Big Diwali Sale 2023 : येतोय दिवाळीचा सर्वात मोठा सेल; 70% पर्यंत मिळणार सूट

टाइम्स मराठी । सध्या सर्व ठिकाणी दिवाळीची जोरदार तयारी सुरू आहे. दिवाळीच्या निमित्ताने बऱ्याच वस्तूंवर कंपन्यांकडून ऑनलाइन आणि ऑफलाइन डिस्काउंट ऑफर देण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर प्रसिद्ध ई-कॉमर्स वेबसाईट Flipkart ने आपल्या ग्राहकांसाठी Flipkart Big Diwali Sale 2023 आणला आहे. हा सेल 2 नोव्हेंबर ते 11 नोव्हेंबर पर्यंत सुरू असेल. या सेलच्या माध्यमातून बऱ्याच प्रोडक्ट वर बंपर डिस्काउंट ऑफर करण्यात येणार आहे.

   

फ्लिपकार्टच्या या दिवाळी सेलमध्ये (Flipkart Big Diwali Sale 2023) ग्राहकांसाठी वेगवेगळ्या वस्तूंवर डिस्काउंट ऑफर करण्यात येणार आहे. यासाठी कंपनीने मायक्रोसाईट देखील लाईव्ह केली आहे. Flipkart कडून या दिवाळी सेलमध्ये  SBI कार्ड धारकांना 10% डिस्काउंट देण्यात येईल. यासोबतच ओरिजनल प्रॉडक्ट वर 60% सूट देण्यात येणार आहे. फ्लिपकार्ट च्या या सेलमध्ये Mobile, SmartTV, किचन प्रोडक्ट, इलेक्ट्रिक प्रॉडक्ट वर देखील अप्रतिम डिस्काउंट ऑफर करण्यात येणार आहे.

एवढ्या किमतीत घरी घेऊन या वॉशिंग मशीन (Flipkart Big Diwali Sale 2023)

फ्लिपकार्टच्या या दिवाळी सेलच्या माध्यमातून मोटोरोला कंपनीची 4k स्मार्ट टीव्ही ग्राहक 9,899 रुपयांमध्ये घरी घेऊन जाऊ शकतात. याशिवाय वॉशिंग मशीन वर देखील बंपर डिस्काउंट ऑफर देण्यात येणार आहे. त्यानुसार तुम्ही वॉशिंग मशीन 6,490 मध्ये खरेदी करू शकतात. या दिवाळी सेलमध्ये साऊंडबार हा 3499 मध्ये खरेदी करता येऊ शकतो. याशिवाय ग्रुमिंग किट 849 रुपयांमध्ये ग्राहकांना मिळणार आहे.

कॅमेरावर देखील मिळणार बेस्ट डील

फ्लिपकार्ट दिवाळी सेलमध्ये Canon, HP, Espon या ब्रँडचे प्रिंटर 2,299 मध्ये खरेदी करता येऊ शकतात. याशिवाय RealMe टॅबलेट देखील ग्राहक 799 रुपयात खरेदी करू शकतात. एवढेच नाहीतर कॅमेरावर देखील बेस्ट डील ऑफर करण्यात येत आहे. त्यानुसार 49 हजार 399 रुपयांच्या सुरुवाती किमतीमध्ये तुम्ही कॅमेरा खरेदी करू शकतात. या सोबतच Samsung या ब्रँडच्या फ्रिजवर देखील डिस्काउंट ऑफर करण्यात येणार आहे. त्यानुसार तुम्ही फ्रीज 9,790 रुपयांमध्ये घरी घेऊन जाऊ शकता.