Flipkart Big Saving Days 2023 : फक्त 7000 रुपयांमध्ये मिळतोय Laptop; नक्कीच लाभ घ्या

Flipkart Big Saving Days 2023 : सध्या भारतात सणासुदीचा काळ सुरु असून Flipkart आणि Amazon वर ग्राहकांसाठी सेल सुरु आहे. या सेलच्या माध्यमातून कपडे, इलेक्ट्रॉनिक वस्तू, टीव्ही, मोबाईल, लॅपटॉप वर मोठ्या प्रमाणात डिस्काउंट ऑफर देण्यात आली आहे. त्यामुळे तुम्ही अगदी कमी किमतीत या वस्तू खरेदी करू शकता. तुम्ही जर स्वस्तात मस्त असा लॅपटॉप घेण्याचा विचार करणार असाल तर Flipkart वर अवघ्या 7000 रुपयांमध्ये तुम्ही लॅपटॉप खरेदी करू शकता. चला तर मग जाणून घेऊया नेमके कोणकोणते हे लॅपटॉप आहेत त्याबद्दल….

   

PRIMEBOOK WIFI MT8183 Laptop

PRIMEBOOK WIFI MT8183 हा लॅपटॉप फ्लिपकार्टच्या बिग बिलियन डेज सेलमध्ये 8990 रुपयांच्या किमतीमध्ये मिळत आहे. भारतीय बाजारपेठेमध्ये या स्मार्टफोनची एमआरपी 18,999 एवढी आहे. परंतु फ्लिपकार्टच्या सेलमध्ये तुम्ही कमी किमतीमध्ये हा लॅपटॉप खरेदी करू शकतात. एवढेच नाही तर या लॅपटॉपवर बँक ऑफरनुसार 10% डिस्काउंट, आणि 1500 रुपयांची सूट सुद्धा देण्यात येत आहे. तुम्ही हा लॅपटॉप EMI ऑप्शन मध्ये देखील खरेदी करू शकता. त्यानुसार तुम्हाला महिन्याला 1499 रुपये भरावे लागेल. जर तुम्ही तुमच्याकडे असलेल्या जुना लॅपटॉप एक्सचेंज करून हा नवीन लॅपटॉप घेणार असाल तर ८२०० रुपयांची येक्सचेंज ऑफर यासोबत देण्यात आली आहे.

या लॅपटॉपचे वजन 1.0 किलो एवढे आहे. त्याचबरोबर कंपनीने या लॅपटॉप 4 GB रॅम आणि 64 GB इंटरनल स्टोरेज ऑप्शन उपलब्ध करून दिले आहे. हा Laptop रॉयल ब्लॅक कलर ऑप्शन मध्ये उपलब्ध असून प्राईम OS ला सपोर्ट करतो. हा लॅपटॉप 11.6 इंच डिस्प्ले सह उपलब्ध आहे. या मध्ये अँड्रॉइड 11  ऑपरेटिंग सिस्टीम देण्यात आली असून मीडियाटेक 8182 प्रोसेसर वर हा लॅपटॉप काम करतो.

ASUS CHROMEBOOK CELERON DUAL CORE N4020

भारतीय बाजारपेठेमध्ये हा लॅपटॉप 24,990 रुपयांना मिळतो. परंतु फ्लिपकार्टच्या बिग बिलियन डेज सेलमध्ये तुम्ही हा लॅपटॉप 10,990 रुपयांना खरेदी करू शकतात. त्याचबरोबर या सेलमध्ये या लॅपटॉपवर एक्सचेंज ऑफर आणि बँक ऑफर देखील उपलब्ध आहे. त्यानुसार जर तुम्ही हा लॅपटॉप खरेदी करणार असाल तर बँक ऑफरनुसार तुम्हाला 1500 रुपयांची सूट मिळू शकते. जर तुम्ही तुमच्याकडे असलेला लॅपटॉप एक्सचेंज करून ASUS CHROMEBOOK घेणार असाल तर तुम्हाला 10,200 रुपयांची एक्सचेंज ऑफर या लॅपटॉप वर मिळू शकते.