ग्राहकांना खुशखबर!! Flipkart Big Saving Days Sale 15 जुलैपासून; बंपर ऑफरचा घ्या लाभ

टाइम्स मराठी । ऑनलाईन शॉपिंग करणाऱ्या ग्राहकांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. प्रसिद्ध ई कॉमर्स प्लॅटफॉर्म Flipkart वर लवकरच बिग सेविंग डे सुरू होणार आहे. या सेलच्या माध्यमातून ग्राहकांना वेगवेगळ्या ऑफर देण्यात येणार आहे. येत्या 15 जुलैपासून हा सेल सुरु होणार असून 19 जुलैपर्यंत ग्राहकांना या सेलच्या माध्यमातून अनेक वस्तूंवर भरगोस सूट मिळणार आहे. अमेझॉन प्राईम डे सेल ला फ्लिपकार्ट चा हा बिग सेविंग डेज सेल टक्कर देणार आहे. अमेझॉनचा हा सेल 15 जुलैपासून सुरू होणार असून फॅशन सह होम ऑफलाईन्सेस, किचन प्रोडक्ट यावर 70% डिस्काउंट देण्यात येणार आहे.

   

बिग सेविंग डे या सेलमध्ये स्कूटर आणि बाईक च्या किमती मध्ये देखील डिस्काउंट देण्यात आलेला आहे. तुम्ही स्कूटर आणि बाईक 54 हजार 999 रुपयांच्या सुरुवाती किमतीत खरेदी करू शकतात. यासोबतच ग्राहकांना फॅशन प्रॉडक्ट आणि कपड्यांमध्ये 50 ते 80 टक्के डिस्काउंट उपलब्ध आहे. यामुळे ग्राहकांना मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो.

Flipkart Big Saving Days Sale मध्ये इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट मध्ये सुद्धा ग्राहकांना बंपर डिस्काउंट देण्यात आलेला आहे. इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट वर 80% डिस्काउंट तसेच मोबाइल ॲक्सेसरीज वर देखील मोठ्या प्रमाणात सूट देण्यात येत आहे. यामध्ये इयर बर्ड्स 499 रुपयात मिळू शकतात. तर मोबाईल कव्हर वर 50% सूट मिळू शकते. एवढेच नाही तर लॅपटॉप वर देखील मोठ्या प्रमाणात सूट देण्यात आलेली आहे. तुम्ही लॅपटॉप 14,990 मध्ये घरी घेऊन घेऊन जाऊ शकता. या सेलमध्ये टीव्ही आणि अप्लायन्सेस वर 75 टक्के सूट , खाण्यापिण्याच्या गोष्टींमध्ये 80 टक्के तर बाईक ईसेन्शिअल आणि फर्निचर वर 80 ते 85 टक्के सूट देण्यात येणार आहे.

Flipkart Big Saving Days Sale मध्ये ॲक्सिस बँकेच्या क्रेडिट कार्डवर दहा टक्के डिस्काउंट देण्यात येणार आहे. त्याचबरोबर जर तुम्ही क्रेडिट कार्ड वरून खरेदी करणार असाल तर 5 टक्के कॅशबॅक आणि 8 टक्के सुपर कॉइन देण्यात येणार आहे. एवढेच नाही तर या सेलमध्ये काही प्रॉडक्ट वर No Cost EMI ऑफर देण्यात येणार आहे. सोबतच डिस्काउंट देखील मिळणार आहे.