Flipkart वर सुरू झालाय दसरा स्पेशल सेल; या Mobile वर मिळतोय बंपर डिस्काउंट

टाइम्स मराठी | सध्या सर्व ठिकाणी फेस्टिवल सिझनचे वातावरण दिसत आहे.  अशातच बऱ्याच कंपन्या त्यांच्या वस्तूंवर डिस्काउंट ऑफर देत असून Flipkart आणि Amazon या ई-कॉमर्स वेबसाईटवर देखील वेगवेगळ्या प्रकारचे सिजनेबल सेल सुरू आहेत. सध्या फ्लिपकार्ट वर दसरा स्पेशल सेल सुरू करण्यात आला असून या सेलच्या माध्यमातून अनेक वस्तूंवर बंपर सूट मिळत आहे.

   

Flipkart चा हा दसरा स्पेशल सेल 22 ऑक्टोबर पासून सुरू झाला असून 29 ऑक्टोबर पर्यंत चालेल. फ्लिपकार्टच्या या सेलच्या माध्यमातून फॅशन रिलेटेड प्रॉडक्ट्स, तसेच स्मार्टफोनवर देखील बम्पर डिस्काउंट ऑफर देण्यात आली आहे. या सेलमध्ये Iphone पासून Samsung, Vivo, Oppo, Realme, Oneplus, या सर्व ब्रँडच्या स्मार्टफोनवर धमाका ऑफर देण्यात मिळतेय.

फ्लिपकार्टच्या बिग दसरा सेलच्या माध्यमातून बँक ऑफर्स देखील उपलब्ध करण्यात येणार आहे. त्यानुसार ICICI बँक कार्ड वर खरेदी केल्यानंतर ग्राहकांना 10 टक्क्यांपर्यंत सूट मिळणार आहे. यासोबतच फ्लिपकार्ट वर स्मार्टफोन खरेदीवर EMI ऑप्शन, एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध करण्यात येणार आहे. यासोबतच बँक ऑफरनुसार 1000 रुपयांचा डिस्काउंट आणि 5000 रुपयांपर्यंत अतिरिक्त एक्सचेंज ऑफर च्या माध्यमातून डिस्काउंट देण्यात येतोय.

Flipkart च्या दसरा स्पेशल सेल मध्ये या सेलमध्ये Google Pixel 8 या स्मार्टफोनवर 3000 रुपयांपर्यंत ॲडिशनल एक्सचेंज डिस्काउंट आणि बँक ऑफर च्या माध्यमातून 8000 रुपयांचा डिस्काउंट देण्यात येत आहे. त्यानुसार तुम्ही हा स्मार्टफोन या सेलच्या माध्यमातून 64,999 मध्ये खरेदी करू शकतात.