पाण्यावर तरंगणारा पूल पाहिलाय का? गाड्याही धावतायत सुसाट (Video)

टाइम्स मराठी । आज कालच्या जगात विज्ञान आणि टेक्नॉलॉजी एवढ्या पुढे गेलेली आहे की, आपण काही गोष्टींचा विचार देखील करू शकत नाही त्या गोष्टी टेक्नॉलॉजी आपल्यासमोर आणत असते. त्याचबरोबर इंजिनीयरने अशा प्रकारे कन्स्ट्रक्शन केलेले आहे की त्यावर कोणाचाच विश्वास बसत नाही. अशाच पद्धतीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे. या व्हिडिओ मध्ये चक्क पाण्यात तरंगणारा पूल दिसत असून यावर चारचाकी गाड्याही अगदी सुसाट धावताना दिसत आहेत.

   

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ चीनमधील एका खोऱ्यातून वाहणाऱ्या नदीच्या पुलाचा आहे. या पुलावरून एक कार पाण्यातून जात असल्याचा हा व्हिडीओ आहे. हा पूल पाण्याच्या वर नाही तर पाण्यात बांधलेला आहे. त्यामुळे हा पूल पाण्यात तरंगतोय की काय असं वाटतं. त्याचबरोबर या तरंगणाऱ्या पुलावरून जाणारी कार पाण्याच्या लहरी अनुभवून जात आहे. हा व्हिडिओ पाहताना कार सोबत नदीतील पाणी देखील प्रवाहासोबत जात असून पूल पाण्यात तरंगताना दिसतो.

चीन येथील दक्षिण पश्चिम हुबेई प्रांतातील झुआन काऊंटी मधील शिजिगुआन फ्लोटिंग ब्रिज वरील हे दृश्य असून हा पूल पाण्यावर तरंगताना दिसतो. हा पूल 500 मीटर लांब आणि 4.5 मिटर रुंद असून या पुलावरून कार चालवण्याचा आनंद घेण्यासाठी जगभरातून लोक मोठ्या प्रमाणावर येत असतात. पाण्यावर तरंगणाऱ्या या पुलाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओला 3 दिवसात 3 लाख लोकांनी लाईक केलेले असून नेटकऱ्यांनी या व्हिडीओ वर बऱ्याच कमेंट्स सुद्धा केलेल्या आहेत. काही यूजर्सनी तर हे फक्त चायनाच करू शकतं असं म्हंटल आहे.