उडत्या विमानाचा दरवाजा अचानक उघडला अन्….;Viral Video पाहून अंगावर येईल काटा

Viral Video | गेल्या काही दिवसापासून एक व्हिडीओ सोशल मीडिया वर व्हायरल होत आहे. या व्हिडीओ मध्ये एका हवेत उडणाऱ्या विमानाचा कार्गो दरवाजा अचानक उघडला असून या विमानातील पेसेंजर खूप घाबरल्याचे दिसत आहे. या पॅसेंजर पैकी एका व्यक्तिने हा व्हिडीओ बनवला आहे. चालू विमानात उघडलेला दरवाजा दाखवणारा हा व्हिडीओ हृदयाचा ठोका चुकवणारा आहे.

   

कुठे घडली घटना-

मिळालेल्या माहितीनुसार साओ लुईसहून साल्वाडोरला जाणाऱ्या ब्राझीलच्या विमानात ही घटना घडली. या विमानात ब्राझीलचे गायक गीतकार आणि त्यांचे साथीदार प्रवास करत होते. तुम्ही हा व्हिडिओ बघितल्यास यामध्ये स्पष्ट दिसत आहे की, विमानाचा दरवाजा पूर्णपणे उघडलेला आहे. विशेष म्हणजे जोरदार वारा आणि वस्तू उडत असताना देखील प्रवासी आश्चर्यकारकपणे शांत बसलेले आहेत. या घटनेत एकाही व्यक्तीला दुखापत झालेली नसून या घटनेनंतर विमान सुखरूप पोहोचले.

नेटकऱ्यांनी देखील केली कमेंट-

हे NHR Taxi Aereo यांच्या द्वारे चालवलेले एम्ब्रेअर-110 विमान होते. आणि साओ लुइस, मॅरान्हो याठिकाणी झालेल्या प्रोग्रामनंतर Tieri आणि त्याच्या बँड सदस्यांना घेऊन जात होते. हा व्हिडिओ ब्रेकिंग एविएशन न्यूज एंड वीडियोज यांच्याकडून शेअर करण्यात आला आहे. सोशल मीडियावर अगदी वाऱ्यासारखा हा व्हिडिओ व्हायरल झाला. हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी कमेंट करून आश्चर्य व्यक्त केलं आहे.