Amazon Great Indian Festival Sale मध्ये या फोल्डेबल Mobile वर मिळतोय बंपर डिस्काउंट

टाइम्स मराठी । आज काल बऱ्याच कंपन्या फोल्डेबल स्मार्टफोन लॉन्च करत आहे. त्यामुळे तरुणाईमध्ये सुद्धा फोल्डेबल मोबाईलची क्रेझ आता दिसत आहे. परंतु या मोबाईलच्या किमती मात्र सर्वसामान्य ग्राहकांना न परवडणाऱ्या आहेत. मात्र सध्या अमेझॉन वर सुरू असलेल्या ग्रेट इंडियन फेस्टिवल सीजनमध्ये या फोल्डेबल स्मार्टफोनवर धमाकेदार ऑफर देण्यात येत आहे. त्यानुसार तुम्ही हे फोल्डेबल मोबाईल कमी किमतीमध्ये खरेदी करू शकतात. चला तर मग जाणून घेऊया नेमकी काय ऑफर आहे.

   

अमेझॉन वर सुरू असलेल्या ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल मध्ये Samsung, Motorola आणि Tecno या कंपनीचे फोल्डेबल फोन डिस्काउंट ऑफर मध्ये उपलब्ध करण्यात येत आहे. त्यानुसार या मोबाईल वर एक्सचेंज ऑफर्स बँक, ऑफर देखील देण्यात येत आहे.  तुम्ही हे पोर्टेबल फोन एक्सचेंज ऑफर च्या माध्यमातून घेणार असाल तर 57000 रुपयांपर्यंत सूट तुम्हाला मिळू शकते. यासोबतच बँक ऑफरच्या माध्यमातून तुम्हाला 7000 रुपयांपर्यंत सूट या फ्लिप फोनवर देण्यात येणार आहे.

samsung galaxy z flip 5 5g

Samsung Galaxy Z Flip 5 5G

Samsung कंपनीच्या फ्लिप फोनची किंमत 1,02,999 रुपये आहे. परंतु Amazon वर सुरू असलेल्या ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल मध्ये या फोनवर डिस्काउंट ऑफर देण्यात येत आहे. त्यानुसार तुम्ही हा स्मार्टफोन 99,999 रुपयात खरेदी करू शकतात. यासोबतच या फेस्टिवल सेलमध्ये एक्सचेंज ऑफर च्या माध्यमातून 57 हजार रुपयांचा डिस्काउंट ऑफर करण्यात येत आहे. एवढेच नाही तर कंपनीकडून बँक डिस्काउंट ऑफर च्या माध्यमातून ₹7000 रुपयांचा डिस्काउंट देण्यात येत आहे. म्हणजेच तुम्ही हा फोल्डेबल फोन कमीत कमी किमतीमध्ये खरेदी करू शकतात.

Motorola Rarz 40 ultra

Motorola Rarz 40 ultra

Motorola Razr 40 ultra मध्ये 165hz रिफ्रेश रेट आणि 1200 निट्स ब्राईटनेस यासह 6.9 इंच फोल्डेबल PoLED डिस्प्ले देण्यात आला आहे. त्याचबरोबर आऊटर साईडने 144hz रिफ्रेश डेट सह 3.6 इंचाचा PoLED डिस्प्ले यासारखे फिचर यात देण्यात आले आहे. या मोबाईलच्या कॅमेरा बद्दल बोलायचं तर प्रायमरी कॅमेरा 12MP आणि अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा 13 MP, 32MP सेल्फी कॅमेरा आहे. या मोबाईलची बॅटरी 3800mAh एवढी असून 30w वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करते. या मोबाईल वर देण्यात आलेल्या डिस्काउंट ऑफर बद्दल बोलायचं झालं तर यामध्ये 33 टक्के डिस्काउंट ऑफर देण्यात येत आहे. या स्मार्टफोनची किंमत एक लाख 1,19,999 रुपये आहे. त्यानुसार तुम्ही हा मोबाईल 79,999 रुपयात खरेदी करू शकतात. त्याचबरोबर या स्मार्टफोनवर एक्सचेंज ऑफरच्या माध्यमातून 57 हजार रुपयांचा डिस्काउंट आणि बँक ऑफरच्या माध्यमातून 6250 रुपयांपर्यंत डिस्काउंट देण्यात येत आहे.

TECNO PHANTOM V Flip

TECNO PHANTOM V Flip

TECNO कंपनीच्या या क्लिप फोन मध्ये 6.9 इंचचा फ्लेक्सिबल AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. यासोबतच या स्मार्टफोनमध्ये कव्हर डिस्प्ले 1.32 इंच चा आहे. या स्मार्टफोनमध्ये देण्यात आलेल्या कॅमेरा बद्दल बोलायचं झालं तर यामध्ये 64 मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा 32 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. मोबाईल मध्ये तुम्हाला 16 GB रॅम आणि 256 GB इंटरनल स्टोरेज मिळेल. या स्मार्टफोनची किंमत 71 हजार 999 रुपये आहे. तुम्ही हा फोल्डेबल फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर अमेझॉनच्या ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल मध्ये या पोर्टेबल फोनवर 24% डिस्काउंट ऑफर देण्यात येत आहे. त्यानुसार तुम्ही हा मोबाईल 54 हजार 999 रुपयात खरेदी करू शकतात. यासोबतच 52,242 रुपयांचा एक्सचेंज ऑफर देखील यावर उपलब्ध आहे. एवढेच नाही तर या स्मार्टफोनवर बँक ऑफर देखील देण्यात आली आहे. त्यानुसार 1000 रुपयांची सूट मिळेल.