स्कुटरच्या दमदार परफॉर्मन्ससाठी ‘या’ गोष्टींचे पालन करा

टाइम्स मराठी । मित्रानो, दैनंदिन कामासाठी आणि रोजच्या प्रवासासाठी स्कूटर (Scooter) हा एक चांगला पर्याय आहे. खास करून शहरी भागात म्हणजेच ज्याठिकाणी वाहनांची मोठी गर्दी पाहायला मिळते अशा ठिकाणी स्कुटर चालवणे अतिशय फायदेशीर मानले जाते. तसेच स्कुटर ही पुरुषांसोबत महिला सुद्धा अगदी आरामात चालवू शकतात. यामुळे अनेकजण स्कुटर खरेदीला प्राधान्य देतात. परंतु स्कुटरचे मायलेज हे इतर कोणत्या दुचाकीपेक्षा कमी असते त्यामुळे आर्थिकदृष्ट्या स्कुटर चालवणे तस परवडत नाही. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला स्कुटरच्या देशभालीबाबत अशा काही टिप्स सांगणार आहोत जिचे पालन केल्यास तुमच्या स्कुटरचा परफॉर्मन्स आणि मायलेज दोन्ही अगदी व्यवस्थित राहील. चला तर मग जाणून घेऊयात….

   

बॅटरीवर खास लक्ष्य द्या-

स्कुटर चालवत असताना तिच्या बॅटरीवर खास लक्ष्य द्या. कारण गंज, लूज कनेक्शन किंवा कमी व्होल्टेजमुळे बॅटरीवर परिणाम होतो. शक्यतो थंडीच्या दिवसात सकासकाळी स्कुटर चालू करत असताना स्टार्टर न मारता किक मारा. यामुळे स्कुटरच्या बॅटरीवर अतिरिक्त ताण येणार नाही. बॅटरीचे स्टेट्स नियमितपणे चेक करा.

टायर वर लक्ष्य ठेवा

गाडीच्या चांगल्या परफॉर्मन्स आणि वेगासाठी चांगले टायर असणे आवश्यक आहे. त्यामुळे चाकातील हवा नेहमी चेक करा. हवा कमी असेल त्याचा परिणाम इंधन कार्यक्षमतेवर होतो.

फ्लुइड लेवल तपासा

इंजिन ऑइल, ब्रेक ऑइल आणि कूलंट यासारख्या आवश्यक फ्लुइड ची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. अशा परिस्थितीत, द्रव पातळी नियमितपणे तपासत रहा. असे केल्याने तुम्हाला ब्रेकिंगशी संबंधित कोणत्याही समस्येचा सामना करावा लागणार नाही.

गाडीचे ब्रेक चेक करा –

गाडी चालवत असताना ब्रेक व्यवस्थित असं अतिशय गरजेचं असत. त्यामुळे गाडीचे ब्रेक चेक करत रहा. तसेच स्कुटर चालवत असताना अचानक ब्रेक मारू नका , असं झाल्यास चाकाला लवकर झीज येते आणि टायर बदलावा लागतो. तसेच ब्रेक फेल झाल्यास तात्काळ गॅरेज वाल्याला दाखवा.