Force Gurkha 5 Door देणार Mahindra Thar ला टक्कर; बाजारात कधी होणार लाँच

टाइम्स मराठी । भारतीय ऑटोमोबाईल निर्माता Force Motor लवकरच Force Gurkha 5 Door ही कार लॉन्च करणार आहे. अनेकदा ही गाडी टेस्टिंग दरम्यान दिसली आहे. परंतु तिचे लौंचिंग नेमकं कधी होणार हे कंपनीने अजून तरी स्पष्ट केलेलं नाही. मात्र एकदा या गाडीचे लौंचिंग झाल्यानंतर बाजारात ती Mahindra Thar ला जोरदार टक्कर देईल हे नक्की… यापूर्वी देखील फोर्स मोटर्सने 2021 मध्ये 3 डोर फोर्स गोरखा ही कार लॉन्च केली होती. ही एक 4×4 पावरफुल 3 डोर कार आहे. आता लवकरच 5 डोर व्हर्जन मध्ये ही कार उपलब्ध होईल. फोर्स गोरखा ही कार पहाडी एरियामध्ये ट्रॅव्हल करू इच्छित असलेल्या ग्राहकांसाठी विकसित करण्यात आली आहे.

   

फीचर– Force Gurkha 5 Door

सोशल मीडियावर Force Gurkha 5 Door या कारचे व्हिडिओ आणि फोटोज व्हायरल होत आहे. ही अपकमिंग कार जुन्या 3 डोर कार पेक्षा जास्त लांब दिसत आहे. यामध्ये बॉक्सिडोर विंडो, फ्रंट एंड, फ्रंट आणि रियर व्हील डिस्क ब्रेक, हेवी ड्युटी फ्रंट, रियर बंपर  यासारखे फीचर्स देण्यात आले आहे. ही कार भारतीय बाजारपेठेमध्ये उपलब्ध असलेली महिंद्रा थार, मारुती जिन्मी, स्कोडा कुशाक, टोयोटा अर्बन क्रूजर हायब्रीड यासारख्या कार सोबत प्रतिस्पर्धा करते.

स्पेसिफिकेशन

Force Gurkha 5 Door या अपकमिंग कार मध्ये  3 डोर प्रमाणेच इंजिन पावर देण्यात येणार आहे. यामध्ये 2.6 लिटर डिझेल इंजन  असेल. हे इंजन 90 PS पावर आणि 250  NM पीक टॉर्क जनरेट करेल. या इंजिन सोबत पाच स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन देण्यात येणार आहे. या कार मध्ये 17 किंवा 18 इंच व्हील्स देण्यात येतील. फोर्स गोरखा 3 डोर या कार प्रमाणेच अपकमिंग कार मध्ये देखील अप्रतिम फीचर्स उपलब्ध करण्यात येतील.

सिक्युरिटी फीचर

Force Gurkha 5 Door मध्ये 7 इंच टच स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम देण्यात येणार आहे.  तीन डोअर फोर्स गोरखा या कारमध्ये अँड्रॉइड ऑटो आणि एप्पल कार प्लेसह मॅन्युअल एसी उपलब्ध करण्यात आला होता. त्याचबरोबर चार स्पीकर साऊंड सिस्टिम फ्रंट पावर विंडो, ड्युअल फ्रंट एअर बॅग, एबीएस सह ईबीडी आणि रियर पार्किंग सेंसर फीचर या तीन डोअर असलेल्या फोर्स गोरखा कार मध्ये उपलब्ध करण्यात आले होते. त्याचप्रमाणे अपकमिंग Force Gurkha 5 Door मध्ये देखील याप्रमाणे फीचर्स उपलब्ध करण्यात येईल अशी आशा आहे.