10 सप्टेंबरपासून ‘या’ राशींचे नशीब बदलणार; भरपूर पैसे मिळण्याची शक्यता

टाइम्स मराठी । वैदिक शास्त्रानुसार राशींचे एकूण बारा प्रकार असतात. त्याचबरोबर बारा राशी नऊ ग्रह आणि 27 नक्षत्र यावर ज्योतिष शास्त्र अवलंबून असते. या 27 नक्षत्रांमध्ये पुष्य नक्षत्र हे अत्यंत शुभ नक्षत्र असल्याचं गणलं जातं. त्याचबरोबर या पुष्य नक्षत्राचा स्वामित्व हे शनी ग्रहाकडे आहे. जेव्हा पुष्य नक्षत्र हे गुरुवार किंवा रविवारी आलं शुभ असल्यास म्हंटल जातं. जर पुश्य नक्षत्र गुरुवारी असेल तर त्यादिवशी गुरुपुष्यामृत योग होतो. त्यानुसारच रविवारी पुष्य नक्षत्र आलं की रवी पुष्य योग निर्माण होतो. हा योग अत्यंत दुर्लभ योग म्हणून गणला जातो. त्यानुसारच आता १० सप्टेंबरला रविवारी पुष्य नक्षत्र असल्यामुळे रविपुष्य योग जुळून आला आहे. एवढेच नाही तर या रविवारी एकादशी देखील असल्यामुळे रवी पुष्य योग आणि एकादशीमुळे हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे.

   

रविवारी 10 सप्टेंबर रोजी संध्याकाळी पाच वाजून सहा मिनिटांनी हा रविपुष्य योग सुरू होणार आहे. आणि 11 सप्टेंबरला सकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांनी हा योग संपेल. या दिवशी सोनं खरेदी करणे वाहन खरेदी घर संपत्ती खरेदी करणे शुभ मानले जाते. कोणत्याही ग्रहांचा नक्षत्रांचा प्रभाव बऱ्याच राशींवर पडत असतो. हा प्रभाव कधी चांगला तर कधी वाईट देखील असतो. त्याच प्रकारे ज्योतिष शास्त्रानुसार या दिवशी काही राशींवर खास प्रभाव पडणार आहे. चला तर या राशी आज आपण जाणून घेऊयात.

१) मिथुन

मिथुन राशींच्या व्यक्तींवर रविपुष्य योगाचा लाभदायी परिणाम दिसून येतो. तसेच हा योग मिथुन राशीसाठी लाभदायी ठरणार आहे. मिथुन राशींच्या व्यक्तींवर लक्ष्मीची कृपा असेल. या कालावधीमध्ये उत्पन्नाचे नवीन स्त्रोत तयार होतील. यासोबतच नशिबाची पूर्ण साथ देखील या कालावधीमध्ये मिळेल. एवढेच नाही तर या कालावधीत मिथुन राशीच्या व्यक्तींचा आत्मविश्वास वाढेल. आणि मोठे निर्णय देखील ते घेऊ शकतील. मिथुन राशींच्या व्यक्तींची वाणी मधुर असेल तर त्यांच्या वाणीचा परिणाम इतरांवर पडेल.

२) सिंह

सिंह राशीच्या व्यक्तीला दुर्लभ असा रविपुष्य योगाचा लाभ मिळेल. सिंह ही रास सूर्याची स्वरास असून या राशीमध्ये सूर्यदेव असतात. यासोबतच रविवारी पुष्य नक्षत्र असल्यामुळे सिंह राशींच्या व्यक्तींवर सकारात्मक परिणाम दिसून येईल. या राशींच्या व्यक्तींचे काही दिवसांपासून अडकलेली काम पूर्ण होतील. त्याचबरोबर सिंह राशीतील व्यक्ती गुंतवणुकीचा विचार करत असाल तर गुंतवणुकीसाठी हा चांगला योग आहे. यासोबतच वाहन आणि संपत्ती खरेदीचे स्वप्न देखील या व्यक्तींचे पूर्ण होतील.

३) तूळ

तुळ राशींच्या व्यक्तींना या काळात विशेष लाभ होणार आहे. तूळ राशीचे व्यक्ती या काळात कुटुंब सोबत जास्त वेळ व्यतीत करतील. आई-वडिलांसोबत गेल्या दिवसांमध्ये खराब झालेले संबंध सुधारतील. करियर मध्ये योग्य संधी मिळतील. त्याचबरोबर समाजामध्ये या व्यक्तींना मान सन्मान मिळेल. एवढेच नाही तर तुळ राशीच्या व्यक्तींना व्यवसायामध्ये मेहनत घ्यावी लागेल. जेवढी मेहनत घ्याल त्यापेक्षाही दुप्पट फळ मिळेल.