बापरे!! स्वतःला आग लावून 272 मीटर धावला; गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद (Video)

टाईम्स मराठी । स्वतःच्या शरीराला आग लावून 272 मीटर धावण्याचा विश्वविक्रम एका 39 वर्षीय फ्रान्सिस फायर फायटरने केला आहे. जोनाथन व्हेरोने असं या व्यक्तीचं नाव असून त्याच्या या भीमपराक्रमाची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे. शरीराला आग लागली असताना सुसाटपणे धावणाऱ्या जोनाथन व्हेरोनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. त्यांच्या या ऐतिहासिक कामगिरीने संपूर्ण जगभरातुन त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

   

गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने स्वतः ट्विट करत या नवीन विक्रमाची घोषणा केली आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, व्हेरोने फक्त ऑक्सिजनशिवाय सर्वात वेगवान फुल बॉडी बर्न 100 मीटर धावण्याचा विक्रम केला नाही तर “फुल बॉडी बर्नमध्ये सर्वात लांब अंतर धावण्याचा विक्रम सुद्धा त्याने केला आहे. व्हेरोने अवघ्या 17 सेकंदात 272.25 मीटर शर्यत पूर्ण केली. त्यामुळे त्याच्या या दमदार कामगिरीची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डला घ्यावीच लागली.

यापूर्वी हा रेकॉर्ड ब्रिटिश शोकिया स्टंटमॅन किथ मेल्कम यांच्या नावावर होता. त्यांनी 204.23 मीटर अंतर पार केलं होत. जोनाथन व्हेरोने यांनी आपली ही रेकॉर्डब्रेक दौड आपल्या घरच्या मैदानावर म्हणजेच हाऊबॉर्डिंन, फ्रान्स या ठिकाणी लगावली. त्यांची इच्छा होती की ज्या शहराने त्यांना मोठं होताना बघितलं किंवा ज्या ॲथलेटिक्स ट्रॅक वर त्यांनी ट्रेनिंग घेतली होती त्या ठिकाणी त्यांना हा रेकॉर्ड बनवायची इच्छा होती.