गदर 2 चित्रपटाचे ॲडव्हान्स तिकीट बुक करा आणि 5000 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळवा

टाइम्स मराठी । बॉलीवूड अभिनेता सनी देओल आणि अमिषा पटेल यांचा गदर 2(Gadar 2) हा चित्रपट 11 ऑगस्टला रिलीज होणार आहे. सध्या गदर 2 या चित्रपटाचे प्रमोशन सुरू असून हा चित्रपट पाहण्यासाठी नागरिकांमध्ये उत्साह आणि एक्साइटमेंट दिसून येत आहे. प्रत्येक व्यक्ती गदर 2 रिलीज होण्याची वाट पाहत असतानाच या चित्रपटासाठी ॲडव्हान्स बुकिंग देखील सुरू झाली आहे. त्याचबरोबर तुम्ही देखील हा चित्रपट पाहण्यासाठी प्लॅन करत असाल तर तुम्ही ॲडव्हान्स बुकिंग च्या माध्यमातून स्पेशल बेनिफिट देखील घेऊ शकतात.

   

गदर 2001 मध्ये लॉन्च करण्यात आला होता. गदर हा चित्रपट इंडस्ट्री मधील सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट बनला होता. त्यानंतर आता गदर 2 हा 11 ऑगस्टला रिलीज होणार आहे. त्यासाठी नागरिकांना एक ऑफर देण्यात येत आहे. ही ऑफर ॲडव्हान्स बुकिंग करणाऱ्या व्यक्तींना लाभदायक ठरेल. कारण जर तुम्ही गदर 2 चित्रपट पाहण्याचा प्लान करत असाल आणि त्यासाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने ॲडव्हान्स तिकीट बुक करत असाल तर तुम्हाला 5000 रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळू शकतो. याचे कारण म्हणजे पेटीएम… जर तुम्ही पेटीएम Paytmॲप वरून ऑनलाईन पद्धतीने गदर 2 या चित्रपटाचे प्री बुकिंग करत असाल तर प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून तुम्हाला 5000 रुपयांचा कॅशबॅक ऑफर करण्यात येणार आहे.

गदर 2 हा चित्रपट पाहण्यासाठी पहिल्याच दिवशी मल्टिप्लेक्स चेनमध्ये 76,600 तिकीट आतापर्यंत विकली गेली आहेत. यामध्ये पीव्हीआर चे 33000, आयनॉक्स चे 25500 आणि सिनेपोलीस चे आतापर्यंत 18100 तिकीट विकली गेली आहेत. गदर चित्रपटाचे ऑनलाइन ॲडव्हान्स तिकीट बुक केल्यास तुम्हाला 5000 रुपयांच्या कॅशबॅक या ऑफरचा लाभ घेण्यासाठी पुढील स्टेप फॉलो करा

1) सर्वात आधी तुमच्या मोबाईल मध्ये पेटीएम ॲप डाऊनलोड करा.
2) ॲप डाऊनलोड केल्यानंतर खाली स्क्रोल करून मूव्ही तिकीट या ऑप्शन वर क्लिक करा.
3) त्यानंतर गदर 2 यावर क्लिक करा. त्यानंतर तुमच्याजवळ असलेल्या थेटर ऑप्शन सिलेक्ट करा.
4) यानंतर तुम्हाला हवे ती सीट बुक करा. यावेळी सीट मॅप चेक करूनच सीट सिलेक्ट करा.
5) यानंतर प्रोसीड या ऑप्शन वर क्लिक करा.
6) प्रोसीड केल्यानंतर पेमेंट या ऑप्शन वर क्लिक करा.
7) ज्यावेळी तुम्ही पेमेंट कराल त्याच वेळी तुम्हाला कॅशबॅक ऑफर देण्यात येतील.