Gadar 2 Collection : गदर 2 ला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद!! 8 दिवसात केली 300 कोटींची कमाई

टाइम्स मराठी । गेल्या सात दिवसांपासून बॉक्स ऑफिसवर सनी देओलची फिल्म गदर 2 मोठ्या प्रमाणात चालत आहे. हिंदी फिल्म इंडस्ट्री साठी हा आठवडा प्रचंड धमाकेदार होता. या आठवड्यामध्ये गदर टू रिलीज झाल्यानंतर बॉक्स ऑफिसवर पैशांचा पाऊस पडतच आहे. अनिल शर्मा यांनी दिग्दर्शित केलेला सनी देओल, अमिषा पटेल, उत्कर्ष शर्मा, सिमरत कौर आणि मनीष वाधवा ही स्टार कास्ट असलेला चित्रपट गदर 2 ने रिलीजच्या आठव्या दिवशी 300 कोटींपेक्षा जास्त कमाई (Gadar 2 Collection) केली आहे. संपूर्ण देशभरामध्ये या चित्रपटाने जबरदस्त यश मिळवले आहे.

   

सात दिवसात कमावले 300 कोटीं– Gadar 2 Collection

सनी देओल आणि अमिषा पटेल च्या या गदर टू मूवी ने दुसऱ्यांदा ही जादू केली आहे. पहिल्या गदर रिलीज नंतर 22 वर्षांनी गदर चा पार्ट 2 पाहण्यासाठी प्रेक्षकांची तिकीट खिडकीवर, सिनेमा हाऊस मध्ये प्रचंड गर्दी केली. गदर 2 हा चित्रपट 11 ऑगस्टला रिलीज करण्यात आला होता. आठ दिवसांमध्ये या चित्रपटाने ने 300 करोड रुपयांपर्यंत कमाई (Gadar 2 Collection) केली आहे. या आठवड्याच्या शुक्रवारी सिनेमाने 19.50 कोटी रुपयांची कमाई केली. भारतामध्ये या सिनेमाने आतापर्यंत 304.13 कोटी रुपये कमावले आहेत. आता आज आणि उद्या शनिवार रविवार असल्यामुळे सिनेमाला आणखीन फायदा होऊ शकतो. या दोन दिवसांमध्ये सिनेमा किती कमाई करेल हे पाहणं आता महत्त्वाचं ठरेल.

गदर 2 आणि ओएमजी 2

अनिल शर्मा दिग्दर्शित गदर टू आणि अक्षय कुमारचा ओएमजी टू दोन्ही एकाच दिवशी रिलीज करण्यात आले होते. गुरुवारी पहिल्याच दिवशी या दोन्ही चित्रपटांच्या कमाई मध्ये गिरावर बघायला मिळाली होती. त्यानंतर विकेट आणि स्वातंत्र्य दिवसाच्या दिवशी सुद्धा गदर 2 च्या कमाई मध्ये 41 टक्क्यांपर्यंत गिरावट आली होती. त्यानंतर गुरुवारी 23.28 करोड रुपयांचा नेट कनेक्शन त्यांनी केलं. आणि आठ दिवसांमध्ये 284.63 करोड रुपयांचा कारोभार केला. हिंदी भाषेमध्ये रिलीज झालेल्या चित्रपटामध्ये बॉक्स ऑफिसवर 300 करोड रुपयांची कमाई (Gadar 2 Collection) करणारा गदर 2 हा 13 वा चित्रपट आहे.

द केरला स्टोरी सिनेमाचा रेकॉर्ड ब्रेक

गदर चित्रपटांमुळे अभिनेता अक्षय कुमार च्या ओएमजी टू सिनेमाला मोठ्या आठवणींचा सामना करावा लागत आहे. बऱ्याच ठिकाणी अक्षयच्या सिनेमाचा कौतुक होत असून प्रेक्षकांना या सिनेमाची कथा आवडली आहे. सनी देओल चा गदर टू सिनेमा हा वर्षातील दुसरा यशस्वी सिनेमा ठरला असून या वर्षातील हिट झालेला पहिला सिनेमा म्हणजे पठाण. पठाण या सिनेमाने फक्त 6 दिवसांमध्ये 300 करोड रुपयांची कमाई केली होती. शाहरुख खानच्या पठाण सिनेमाने 543.05 कोटी रुपयांची कमाई केली आहे. सध्या गदर टू ने द केरला स्टोरी सिनेमाचा रेकॉर्ड ब्रेक केलेला असून पठाण सिनेमाला देखील हा चित्रपट मागे टाकतो की काय हे पाहणं आता मजेशीर ठरणार आहे