चंद्रयाननंतर आता मिशन गगनयान; ISRO मानवाला अंतराळात पाठवणार

टाइम्स मराठी । काही दिवसांपूर्वी चांद्रयान ३ च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्था ISRO आपलं पाऊल आणखी पुढे टाकलं आहे. चांद्रयानानंतर आता ISRO गगनयानच्या माध्यमातून मानवाला अंतराळात पाठवणार आहे. या गगनयान मिशन च्या सर्विस मॉड्यूल प्रोपल्शन सिस्टिम (SMPS) चे गुरुवारी यशस्वीरित्या परीक्षण केले गेले. हे गगनयान मिशन ISRO साठी सर्वात मोठे यश आहे.

   

या गगनयान मिशन मधला सर्विस मॉडेल पॉप्युलेशन सिस्टीम SMPS हा ऑर्बिटल मॉड्युलच्या संपूर्ण आवश्यकता पूर्ण करतो. तमिळनाडू मधील महेंद्रगिरी येथील प्रोपल्शन कॉम्प्लेक्स मध्ये ISRO च्या हॉट टेस्ट च्या अंतिम कॉन्फिगरेशनचे आयोजन करण्यात आले होते. हे गगनयान आपल्या देशासाठी आणि इस्रो साठी खूप महत्त्वाचे मिशन असून पुढच्या वर्षी लॉन्च करण्यात येणार आहे. केंद्रातील मोदी सरकारने गगनयान मोहिमेसाठी इस्रोला 10 हजार कोटी रुपयांचा निधी दिला आहे. गगनयानच्या माध्यमातून अंतराळवीरांना पृथ्वीपासून 400 किलोमीटर उंचीवर पाठवण्याची इस्त्रोची योजना आहे.

गगनयानमध्ये इस्रोच्या तीन अंतराळ मोहिमांचा समूह आहे. त्यापैकी दोन मोहिमेमध्ये मानव व्यतिरिक्त तर तिसऱ्या मोहिमेमध्ये मानवालाही आंतरिक्ष मध्ये पाठवण्यात येणार आहे. त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे यामध्ये तीन अंतरिक्ष यात्री पाठवण्यात येणार आहे. त्यापैकी दोन पुरुष तर एक महिला असेल अशी माहिती हाती येत आहे. इस्रो या गगन यान मिशन साठी मोठ्या प्रमाणात चाचण्या करत असून मोठ्या प्रमाणावर तयारी सुरू आहे. इस्रोचा मेन उद्देश हा पृथ्वीच्या पहिल्या कक्षेत मानवयान पाठवायचा आहे. हे मिशन यशस्वी झाल्यानंतर अमेरिका, रशिया आणि चीन यासारख्या देशांच्या यादीमध्ये भारताचा देखील नंबर लागेल.