Gaganyaan Mission : चंद्रयान 3, आदित्य L1 नंतर आता गगनयान लॉन्चिंगची तयारी; 21 ऑक्टोबरला होईल टेस्टिंग

Gaganyaan Mission । चंद्रयान 3 आणि आदित्य L1 नंतर आता ISRO मिशन गगनयान साठी सज्ज झाल आहे. त्याचाच भाग म्हणजे 21 ऑक्टोबरला गगनयान मोहिमेची पहिली टेस्टिंग करण्यात येणार आहे. याबाबत मंगळवारी विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह यांनी माहिती दिली. चंद्रयान 3 आणि आदित्य L1 या मिशन मध्ये सहभागी झालेल्या इंजिनियर्सच्या कौतुक सोहळ्यामध्ये  ते बोलत होते. हे मानव सोबत मिशन असणार आहे. त्यामुळे या गगनयान मिशन मध्ये सहभागी होणाऱ्या कृ मेंबरची सुरक्षा आणि सुनिश्चितपणे हे कृ मेंबर परत येण्यासाठी नौसेनाने मॉड्युलची मॉक टेस्ट सुरू केली.

   

बंगालच्या उपसागरात उतरवण्यासाठी करण्यात येईल टेस्टिंग

गगनयान मिशनसाठी ज्या कृ मॉडेलमधून अंतराळवीर यात्री पाठवण्यात येणार आहे, त्या मॉडेलचे नाव TV D1 असे आहे. याचा अर्थ टेस्ट व्हेईकल अर्बॉट मिशन 1 असं आहे. हे मॉडेल आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतरिक्ष केंद्रातून लॉन्च करण्यात येणार आहे. या मॉडेलमध्ये कृ मेंबर्सला  बसवून अंतराळामध्ये 400 किलोमीटर दूर पाठवण्यात येणार आहे. आणि त्यानंतर हे पुन्हा पृथ्वीवर परत आणून बंगालच्या उपसागराच्या समुद्रामध्ये उतरवण्यासाठी टेस्टिंग करण्यात येणार आहे.

पुढच्या वर्षी करण्यात येईल मिशन लॉन्चिंग– Gaganyaan Mission

गगनयानमध्ये इस्रोच्या तीन अंतराळ मोहिमांचा समूह आहे. त्यापैकी दोन मोहिमेमध्ये मानव व्यतिरिक्त तर तिसऱ्या मोहिमेमध्ये मानवालाही अंतराळात पाठवण्यात येणार आहे. त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे यात ३ अंतराळवीर पाठवण्यात येणार आहे. गगनयान या मिशनमध्ये भारतीय हवाई दलातील सक्षम वैमानिकांना अंतराळवीर म्हणून पाठवण्यात येणार आहे. यामध्ये भारतीय नौसेना आणि कोस्ट गार्डचा देखील समावेश आहे. यासाठी या वैमानिकांचा प्रशिक्षण सुरू असून गगन यानाच्या फायनल लॉन्चिंग पूर्वी बऱ्याच चाचण्या केल्या जाणार आहे. गगन यान हे भारताचं आतापर्यंतचा सर्वात महागडे मिशन असेल.