Gaganyaan Mission : ISRO च्या गगनयान मिशनचे चाचणी उड्डाण यशस्वी; मानवरहित मोहिमांचा मार्ग मोकळा

टाइम्स मराठी । भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच ISRO च्या माध्यमातून बऱ्याच दिवसांपासून गगनयान या मोहिमेची (Gaganyaan Mission) तयारी सुरू होती. त्यानुसार आज म्हणजेच 21 ऑक्टोबरला गगनयान मोहिमेचे टेस्टिंग करण्यात आली. ही चाचणी पूर्णपणे यशस्वी ठरली असून टेस्ट वेहिकल TV D1 या रॉकेटचे प्रक्षेपण आज दहा वाजता करण्यात आले. या टेस्टिंगच्या माध्यमातून मानवरहित मोहिमांचा मार्ग मोकळा झाला आहे. म्हणजेच गगनयान मोहिमेसाठी आता मानव पाठवण्यामध्ये कोणतीच अडचण येणार नाही.

   

या गगनयान मोहीमचे लॉन्चिंग आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतरिक्ष केंद्र या ठिकाणावरून करण्यात आले . या मिशन साठी रॉकेट प्रक्षेपित केल्या गेल्यानंतर 17 किलोमीटर उंचाईवर सोडण्यात आलं. त्यानंतर पॅराशुटच्या माध्यमातून क्रू मॉड्युल हळूहळू समुद्राकडे जाईल असं सांगण्यात येत आहे.  इस्रोच्या गगनयान मिशनचे लॉन्चिंग सकाळी साडेसात वाजता करण्यात येणार होते परंतु काही टेक्निकल प्रॉब्लेम आणि खराब वातावरणामुळे हे लॉन्चिंग लांबवण्यात आलं . लॉन्चिंग च्या 5 सेकंद आधी हे मिशन थांबवण्यात आले होते. त्यानंतर दहा वाजता हे मिशन यशस्वीपणे पार पडले.

गगनयान मिशन 2025 मध्ये लॉन्च करण्यात येणार – Gaganyaan Mission

गगनयान मिशन साठी ज्या कृ मॉडेल मध्ये अंतरिक्ष यात्री पाठवण्यात येणार आहे, त्या मॉडेल चे नाव TV D1 असे आहे. म्हणजे टेस्ट व्हेईकल अर्बॉट मिशन 1 असं आहे. या मॉडेलमध्ये कृ मेंबर्सला बसवून अंतराळामध्ये 400 किलोमीटर दूर  पाठवण्यात येणार आहे. आणि त्यानंतर हे पुन्हा पृथ्वीवर परत आणून बंगालच्या उपसागराच्या समुद्रामध्ये उतरवण्यासाठी टेस्टिंग करण्यात येणार आहे. गगनयान मिशन 2025 मध्ये लॉन्च करण्यात येणार आहे. गगनयान मिशन च्या टेस्टिंगसाठी पाठवण्यात आलेले TV D1 यामध्ये सुधारित विकास इंजिनचा वापर करण्यात आला आहे. या रॉकेटच्या पुढील भागांमध्ये क्रू मॉड्युल आणि क्रू एस्केप सिस्टीम ही उपकरणे बसवण्यात आले आहे. 

गगनयानमध्ये (Gaganyaan Mission) इस्रोच्या तीन अंतराळ मोहिमांचा समूह आहे. त्यापैकी दोन मोहिमेमध्ये मानव व्यतिरिक्त तर तिसऱ्या मोहिमेमध्ये मानवालाही अंतराळात पाठवण्यात येणार आहे. महत्त्वाचं म्हणजे यात तीन अंतराळवीर पाठवण्यात येणार आहे. गगनयान या मिशनमध्ये भारतीय हवाई दलातील सक्षम वैमानिकांना अंतराळवीर म्हणून पाठवण्यात येणार आहे. यामध्ये भारतीय नौसेना आणि कोस्ट गार्डचा देखील समावेश आहे. यासाठी या वैमानिकांचा प्रशिक्षण सुरू असून गगनयानाच्या फायनल लॉन्चिंग पूर्वी बऱ्याच चाचण्या केल्या जाणार आहे. गगन यान हे भारताचं आतापर्यंतचा सर्वात महागडे मिशन असेल.