Samsung ने लाँच केलं Galaxy S23 FE च नवं एडिशन; पहा किंमत आणि फीचर्स

टाइम्स मराठी । भारतीय बाजारपेठेमध्ये सॅमसंगने Galaxy S23 या स्मार्टफोनचे नवीन अफॉर्डेबल मॉडेल लॉन्च केले आहे. हे मॉडेल GALAXY S23 लाईनअपच्या फॅन एडिशन मध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. हे नवीन मॉडेल मिंट, पर्पल आणि ग्रेफाइट या कलर ऑप्शन मध्ये उपलब्ध आहे. जाणून घेऊया या स्मार्टफोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन

   

स्पेसिफिकेशन

Galaxy S23 FE 5G या स्मार्टफोनमध्ये 6.4 इंच डायनमिक AMOLED 2X डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 120Hz एडॉप्टिव रिफ्रेश रेट मिळतो. या मोबाईल मध्ये 4500 mAh बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 25 W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. आणि ३० मिनिटांमध्ये 50% चार्ज होते.

कॅमेरा-

Galaxy S23 FE 5G या नवीन मोबाईल मध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअपसह ऑप्टिकल इमेज स्टेबलाइजेशन देण्यात आले आहे. त्यानुसार 50 मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. यासोबतच 12MP अल्ट्रा वाइड कैमरा आणि 8MP टेलीफोटो लेंस देखील या स्मार्टफोनमध्ये उपलब्ध आहे. या मोबाईल मध्ये देण्यात आलेल्या कॅमेरा मध्ये नायटोग्राफी, 3x ऑप्टिकल जूम, वीडियो स्टेबलाइजेशन यासारखे फीचर्स देण्यात आले आहे.

अन्य फिचर्स

Galaxy S23 FE 5G या स्मार्टफोनमध्ये गेमिंग आणि स्ट्रीमिंग करणे, मल्टी टास्किंग करणे हा अनुभव अप्रतिम आहे. गेमिंग वेळी स्मार्टफोन गरम होऊ नये यासाठी कूलिंग आणि वेपर चैंबर टेक देखील यामध्ये उपलब्ध आहे. या स्मार्टफोनमध्ये देण्यात आलेला डिस्प्ले लाईटनिंग कंडिशन च्या माध्यमातून ब्राईटनेस आपोआप कमी जास्त होतो. या स्मार्टफोन मध्ये देण्यात आलेल्या डिस्प्ले च्या माध्यमातून विविड कलर्स आणि अप्रतिम कॉन्ट्रास्ट ग्राहकांना पाहता येईल.

किंमत

Galaxy S23 FE हा मोबाईल दोन स्टोरेज व्हेरिएंट मध्ये उपलब्ध करण्यात आला आहे. त्यानुसार 8 GB रॅम आणि 128 GB इंटर्नल स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत 59,999 रुपये एवढी आहे. परंतु कंपनीकडून हा स्मार्टफोन तुम्ही 49,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकतात. यासोबतच 8 GB रॅम आणि 512 GB स्टोरेज असलेल्या व्हेरिएंट ची किंमत 64,999 रुपये एवढी आहे. परंतु तुम्ही 54,999 मध्ये खरेदी करू शकतात.