टाइम्स मराठी । Samsung कंपनी भारतीय बाजारपेठेमध्ये वेगवेगळ्या सेगमेंटचे मोबाईल लॉन्च करत असते. काही महिन्यांपूर्वी सॅमसंगने फोल्डेबल आणि फ्लिप स्मार्टफोन लॉन्च केला होता. आता कंपनीने Samsung Galaxy Z Flip Maison Margiela Edition लॉन्च केला आहे. काही दिवसांपासून या मोबाईलच्या लॉन्चिंग बद्दल चर्चा होती. हे फ्लिप स्मार्टफोनचे लेटेस्ट स्पेशल एडिशन असून रेट्रो एडिशन, स्पेशल कलर एडिशन, आणि बीटीएस एडिशन मध्ये ऍड झाले आहे. कंपनीने हा स्मार्टफोन फ्रान्सिस लक्झरी फॅशन हाऊस मैसन मार्जिएला सोबत मिळून डेव्हलप केला आहे. जाणून घेऊया या स्मार्टफोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन.
डिझाईन आणि पॅकिंग
Galaxy Z Flip 5 Maison Margiela Edition हा स्मार्टफोन 2 प्रसिद्ध ब्रँड ने मिळून डेव्हलप केला आहे. यापूर्वी देखील दोन्ही ब्रँड ने मिळून galaxy Z Flip 4 चे स्पेशल एडिशन डेव्हलप केले होते. या नवीन लॉन्च करण्यात आलेल्या स्मार्टफोन मध्ये डिझाईनसह एक रियर ग्लास देण्यात आला आहे. या मोबाईल सोबतच एक फ्लॅप लेदर केस, एक फ्लिप सूट केस, दोन फ्लिप सूट कार्ड देण्यात आले आहे. हे फ्लिप सूट कार्ड पेंट स्प्लेंटर डिझाईन आणि सिल्वर प्लेट सह मिळेल. हे मैसन मार्जिएलाच्या नंबरिंग डिझाईन मध्ये दिसेल. जेव्हा युजर्स हे कार्ड फोनच्या मागील बाजूस संलग्न करेल, तेव्हा मोबाईल त्वरित नवीन थीम स्वीकारेल. आणि ही थीम फ्लेक्स विंडोवर दिसून येईल.
स्पेसिफिकेशन
Galaxy Z Flip 5 Maison Margiela Edition या मोबाईल मध्ये 6.7 इंच FHD प्लस डायनामिक AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 2640×1080 पिक्सेल रिझोल्युशनला सपोर्ट करतो. आणि 120 हर्टज ऍडॉप्टीव्ह रिफ्रेश रेट ऑफर करतो. या मोबाईल मध्ये 3.4 इंच SUPER AMOLED कव्हर डिस्प्ले देण्यात आला आहे. यामध्ये 60 hz रिफ्रेश रेट सपोर्ट मिळतो. या स्मार्टफोनमध्ये देण्यात आलेल्या डिस्प्ले हा रियर पॅनल कॉर्निंग गोरिला ग्लास विक्ट्स 2 प्रोटेक्शन सह मिळतो.
कॅमेरा
या मोबाईल मध्ये फोटोग्राफीसाठी ड्युअल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. यामध्ये OIS सह 12 MP प्रायमरी कॅमेरा, 12 MP अल्ट्रा वाईड कॅमेरा, 10 MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 3700 mAh बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 25 W फास्ट चार्जिंगला आणि 15 W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते. या स्मार्टफोनची बॅटरी फक्त 30 मिनिटांमध्ये 0 ते 50 टक्के चार्ज होते.
प्रोसेसर
या स्मार्टफोन मध्ये कंपनीने क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 GEN 2 प्रोसेसर दिला आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइड 13 वर बेस्ड ONEUI 5.1.1 वर काम करतो. या मोबाईल मध्ये 8 GB रॅम आणि 256 GB / 512 GB स्टोरेज मिळते. कंपनीने या मोबाईल मध्ये कनेक्टिव्हिटी साठी टाईप सी पोर्ट, ई सिम सपोर्ट उपलब्ध केला आहे. या स्मार्टफोनच्या किमती बद्दल अजून खुलासा करण्यात आलेला नसून 30 नोव्हेंबर पासून हा मोबाईल विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.