टाइम्स मराठी । WhatsApp वरून आजकाल अनेक कामे शक्य झाली आहेत. यापूर्वी आपण फक्त चॅटिंग आणि इमेज, विडिओ शेअरिंग साठी व्हाट्सअँप वापरत होतो, पण आता तंत्रज्ञान अजून पुढे गेलं असून आपण वैयक्तिक किंवा ऑफिशिअली कामे सुद्धा WhatsApp च्या माध्यमातून करू शकतो. तसेच एकमेकाना पैसे सुद्धा पाठवू शकतो. पण तुम्हाला माहित आहे का? आपण WhatsApp वरून गॅस सिलिंडर सुद्धा बुकिंग करू शकतो. होय हे खरं आहे. त्यासाठी नेमकं काय करावं लागेल तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
WhatsApp च्या माध्यमातून तुम्हाला गॅस सिलिंडरचे बुकिंग करायचं असेल तर नोंदणीकृत मोबाईलवरुन कंपनीच्या क्रमांकावर संपर्क करावा लागेल. त्यावर मॅसेज पाठवावा लागेल. यापैकी HP GAS- चा क्रमांक 9222201122, भारत गॅस- 1800224344 आणि Indane- 7588888824 हे नंबर तुमच्या मोबाईल मध्ये अगोदर सेवा करून ठेवा . तुमचा गॅस वरील पैकी ज्या कंपनीचा आहे त्या नंबर ला तुम्हाला WhatsApp वरून मेसेज करावा लागेल.
अशी आहे प्रोसेस –
सर्वात आधी सदर गॅस कंपनीचा नंबर सेव्ह करून व्हाटसअप वरून HI मेसेज करा
त्यानंतर तुम्हाला तुमची भाषा निवडावी लागेल.
यानंतर, तुम्ही येथून गॅस बुक, नवीन कनेक्शन, कोणतीही तक्रार इत्यादी सर्व काही करू शकता.
यानंतर तुमच्या मोबाईल स्क्रीनवर अनेक पर्याय दिसतील ज्यामधून तुम्ही गॅस बुकिंगचा पर्याय निवडा
गॅस रिफिल बुकिंग केल्यानंतर तुम्हाला ऑर्डर पूर्ण झाल्याची सूचना मिळेल.
तुमचा सिलिंडर कधी डिलिव्हरी होईल ती तारीख सुद्धा तुम्हाला समजेल
गॅस बुकिंगची स्थिती जाणून घेण्यासाठी तुम्हाला STATUS आणि ऑर्डर क्रमांक लिहून त्याच क्रमांकावर पाठवावा लागेल.