Gehana Vasisth Wedding : ‘गंदी बात’ फेम गहना वशिष्ठने केलं मुस्लिम प्रियकरासोबत लग्न; फोटो व्हायरल…

Gehana Vasisth Wedding : अलीकडे बॉलिवूड सोबतच वेबसिरीजमध्ये काम करणाऱ्या कलाकारांनासुद्धा खूप लोकप्रियता मिळताना दिसते. AltBalaji या मनोरंजन अँपवर रिलीज झालेली गंदी बात नावाची सिरीज खूपच चालली. यामधील बोल्ड सीनमुळे यावर तरुण वर्गात वेगळीच क्रेज पाहायला मिळाली. आता यामध्ये सर्वाधिक अडल्ट सिन दिलेली अभिनेत्री गेहना वशिष्ठ तिच्या लग्नाच्या फोटोंमुळे चर्चेत आली आहे.

   

गेहनाने मुस्लिम प्रियकरासोबत लग्नगाठ बांधल्याची मीडियात चर्चा आहे. गहनाचे मुस्लिम प्रियकरासोबतचे फोटो सध्या सोशल मीडियात व्हायरल होत असून हा ट्रेंडिंग टॉपिक बनला आहे. गेहना वशिष्ठने गुपचूप लग्न केल्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. फैजान अन्सारी नावाच्या व्यक्तीशी गेहनाने लग्न केले आहे.

गेहना वशिष्ठ बॉयफ्रेंड फैजानसोबत बऱ्याच दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये होती. यानंतर आज त्यांच्या विवाहाची बातमी समोर आली. फार कमी लोकांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा पार पडला. अद्याप गेहान वशिष्ठने स्वत: तिच्या लग्नाची बातमी कोणालाही दिलेली नाही. वधूच्या पोशाखातील गेहना वशिष्ठचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. शेवटी प्रेम प्रेम असत अन प्रेमाला कोणताच रंग नसतो हे यातून दिसत आहे.