कोणत्याही वीजेशिवाय चालतोय ‘हा’ गिझर; पाणीही तापतंय अगदी कडक

टाइम्स मराठी । लवकरच हिवाळा सुरू होणार आहे. हिवाळ्यामध्ये  गरम पाण्याची मोठ्या प्रमाणात गरज असते. अशावेळी  बरेच जण गिझर, इन्वर्टर, पीएनजी घेण्याचा विचार करतात. परंतु इन्वर्टर मुळे विजेचे बिल मोठ्या प्रमाणात येते. या कारणाने इन्व्हर्टर आपण संपूर्ण हिवाळा वापरू शकत नाही. कारण गरम पाण्याची गरज दररोज असल्यामुळे दररोजचे बिल वाढत जाते. त्यामुळे पाणी गरम करण्यासाठी इन्व्हर्टर हा पर्याय योग्य वाटत नाही. पण तुम्ही गॅसवर चालणाऱ्या इन्व्हर्टरचा वापर करू शकतात. जेणेकरून विज बिल देखील वाढणार नाही. जर तुम्ही देखील हिवाळ्यासाठी तयारी सुरू केली असेल  आणि इन्व्हर्टर घेण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला काही इन्वर्टर, गिझर (Geyser) बद्दल सांगणार आहोत, ज्यामुळे तुमचे विज बिल देखील वाचेल आणि  वॉटर हीटिंग देखील होईल.

   

HINDWARE ATLANTIC EVETO

हिवाळ्यात पाणी गरम करण्यासाठी तुम्ही गॅस गिझर किंवा  PNG देखील खरेदी करू शकतात. त्यासाठी तुम्हाला विजेची गरज भासणार नाही. याबरोबर या गॅस गिझर मध्ये तुम्हाला तापमान सेट करण्याचे देखील ऑप्शन देण्यात येणार आहे. त्यानुसार तुम्ही पाणी गरम करू शकता. या गॅस गिझर मध्ये फ्लेम व्हॅलीवर प्रोटेक्शन देखील देण्यात आले आहे. या गॅस गिझर ची किंमत 8990 आहे. तुम्हाला हे खरेदी करायचं असेल तर ॲमेझॉन- फ्लिपकार्ट यासारख्या शॉपिंग ॲपवर हे गिझर कमी किमतीमध्ये मिळू शकतील.

Shinestar Gas Geyser 10L

हे अत्यंत प्रसिद्ध असं गिझर आहे. या गिझरच्या माध्यमातून पाणी तापवण्यासाठी फक्त गॅसची गरज असते. तुम्ही हे गिझर इंडिया मार्टच्या माध्यमातून खरेदी करू शकतात.  यासाठी जास्त गॅसची गरज देखील नसून कमी गॅसवर देखील पाणी गरम होऊ शकते. आकाराने हे अत्यंत छोटे असून तुम्ही हे गिझर कुठेही फिट करू शकतात. या गिझर ची किंमत फक्त 4189 एवढी आहे.

Racold LPG-PNG Gas Water Heater

Racold हे अत्यंत पॉप्युलर कंपनीचा गिझर आहे. त्याचबरोबर या कंपनीचे  LPG GAS WATER HEATER हे अत्यंत फेमस प्रॉडक्ट आहे. हे हिटर खरेदी करण्यासाठी तुम्हाला 8990  रुपये खर्च पडेल.  हे किमतीमध्ये महाग असले तरीदेखील चांगल्या क्वालिटीचे हीटर आहे. तुम्ही हे इतर कोठेही फिट करू शकता.