Gin X E -Bike : 121 KM रेंज देतेय ‘ही’ Electric Bike; बाजारात घालणार धुमाकूळ

Gin X E -Bike : सध्या सर्वत्र इलेक्ट्रिक बाईकची जोरदार चर्चा असते. पेट्रोलचा खर्च वाचवण्यासाठी अनेकजण इलेक्ट्रिक गाडी खरेदीला आपली पसंती दर्शवतात. त्यामुळे मार्केट मधेही अनेक वाहन निर्माता कंपनी आपल्या गाड्या इलेक्ट्रिक व्हर्जन मध्ये बाजारात उतरवत असतात. या एकूण सर्व पार्श्वभूमीवर Gin कंपनीने नवीन इलेक्ट्रिक बाईक लॉन्च केली आहे. या बाईकच्या रूपात कंपनीने Gin X लाईनअप मध्ये आणखीन एक बाईक ऍड केली आहे. आज आपण या इलेक्ट्रिक बाईकचे खास फीचर्स आणि किमतीबाबत जाणून घेऊयात.

   

Gin X E -Bike मध्ये हँडल बारच्या खाली एक इंटिग्रेटेड डिस्प्ले देण्यात आला आहे. हा इंटिग्रेटेड डिस्प्ले बॅटरी स्टेटस, राईड आणि परफॉर्मन्स पर्यंत माहिती दर्शवतो. Gin X ही इलेक्ट्रिक बाइक ग्रीन फ्रायडे सेल डिस्काउंटनंतर वेबसाईटवर 1,24,722 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. डिस्काउंट ऑफर नुसार ही किंमत फक्त काही कालावधीसाठी उपलब्ध असून लवकरच ही बाईक आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये देखील लॉन्च करण्यात येणार आहे. जाणून घेऊया या बाईकचे फीचर्स.

बॅटरी- Gin X E -Bike

Gin X या ई बाइक मध्ये 615 Wh बॅटरी देण्यात आली आहे. ही टेस्ला क्लास वाली बॅटरी सिंगल चार्जवर 121 किलोमीटर एवढी रेंज देते. या बाईकमध्ये झूम हायड्रोलिक डिस्क ब्रेक आणि सस्पेन्शन फोर्क सिस्टीम मिळते. कंपनीने या बाईकमध्ये पाच रायडिंग मोड सह थंब थ्रोटल सह ही बाईक उपलब्ध आहे.

फिचर्स

Gin X E -Bike मध्ये जुन्या मॉडेल पेक्षा जास्त फीचर्स आणि सिक्युरिटी प्रदान करण्यात आली आहे. यामध्ये हाय पावर असलेली बॅटरी आणि ऑल टेरेन टायर मिळतात. यामुळे ही बाईक जास्त आकर्षित दिसते. या Gin X  बाईक मध्ये ॲल्युमिनियम फ्रेम आणि इंटिग्रेटेड लाईट देण्यात आले आहे. या बाईकचे वजन 20 किलो एवढे असून 27.5×2.1 इंच टायर यामध्ये मिळतात.