Gmail मधील डॉक्युमेंट फाईल्स या सोप्प्या पद्धतीने करा डिलीट

टाइम्स मराठी | Google ने काही दिवसांपूर्वी Google Cloud  आणि Google Drive युजर्स ला एक्स्ट्रा डेटा घेण्यासाठी पैसे भरावे लागेल अशी माहिती दिली होती. त्यानुसार Google कडून यूजर्सला 15 GB फ्री क्राउड स्टोरेज मिळते. आता तुम्हाला 15 GB पेक्षा जास्त क्राउड स्टोरेज हवे असेल तर पैसे भरून स्टोरेज घ्यावे लागणार आहे. जर तुम्हाला पैसे भरून स्टोरेज घ्यायचे नसेल तर तुम्ही गुगल ड्राईव्ह किंवा गूगल क्राउड मध्ये उपलब्ध असलेला डेटा क्लियर करू शकतात.

   

गुगल क्राऊड किंवा ड्राइव्ह मध्ये फोटो, जीमेल अटॅचमेंट, डेटा, व्हाट्सअप बॅकअप यासारख्या बऱ्याच गोष्टी स्टोअर करून ठेवल्या जातात. आणि स्टोरेज पूर्णपणे भरले जाते.  बऱ्याचदा Gmail वर गरजेचे नसलेले mails आणि जास्त MB वाल्या फाइल्स सेव्ह होतात. त्यामुळे स्टोरेज पूर्णपणे भरते. या हेवी अटॅचमेंट असलेल्या फाइल्स हटवण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागते. यामुळे टाईम देखील मोठ्या प्रमाणात जातो. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीने या हेवी अटॅचमेंट असलेल्या फाइल्स डिलीट करू शकतात. त्यासाठी तुम्हाला पुढील पद्धत वापरावी लागेल.

अशा पद्धतीने डिलीट करा हेवी अटॅचमेंट फाईल्स

Gmail वर उपलब्ध असलेल्या हेवी फाईल शोधण्यासाठी  सर्वात आधी Gmail ॲप ओपन करा. त्यानंतर सर्च बार वर क्लिक करा. तुम्ही सर्च बारमध्ये  5MB, 2MB अशा पद्धतीने साईज टाकून फाईल सर्च करू शकतात. सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर सर्चिंग प्रमाणे फाइल्स उपलब्ध होतील. त्यानंतर तुम्ही या दिसत असलेले सर्व mails डिलीट करू शकता. जेणेकरून तुमचे स्टोरेज मोकळं होण्यास मदत होईल. Mail डिलीट केल्यानंतर ट्रॅश मधून देखील या फाइल्स डिलीट करायला विसरू नका. कारण ट्रॅश मध्ये उपलब्ध असलेले डिलीटेड mail पुन्हा 30 दिवसांनी रिस्टोर होतात.