टाइम्स मराठी । Google देत असलेल्या सुविधांपैकी एक सुविधा म्हणजेच G- Mail … G Mail चा वापर आज कालमोठ्या प्रमाणात केला जातो. पर्सनल ऑफिशियल कामासोबतच ऑफिसला मेल पाठवण्यासाठी देखील जीमेल वापरतात. जीमेल मध्ये यापूर्वी बऱ्याच सुविधा उपलब्ध नव्हत्या. त्यामुळे जीमेल वापरताना बऱ्याच समस्यांचा सामना करावा लागत होता. परंतु आता गुगलकडून वेगवेगळे फीचर्स जीमेल मध्ये उपलब्ध करण्यात येत आहे. त्यानुसार आता गुगलने सर्वात मोठा प्रॉब्लेम सॉल्व केला आहे. हा प्रॉब्लेम होता लैंग्वेज ट्रान्सलेट चा. आता गुगलने लैंग्वेज ट्रांसलेट फीचर्स युजर साठी उपलब्ध केले आहे.
बऱ्याचदा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे मेल येत असतात. सहसा हे मेल्स इंग्रजी मध्ये असतात. याशिवाय हिंदी किंवा मराठी इंग्रजी या तिन्ही भाषेपैकी कोणत्याही भाषेत असलेले ई-मेल आपण सहजरीत्या वाचतो. परंतु जर वेगळ्याच भाषेत एखादा ईमेल आला असेल तर आपली चांगली भंबेरी उडते. त्यामुळे गुगलने नवीन लॅंग्वेज ट्रान्सलेट फीचर उपलब्ध केले आहे. या फीचरच्या माध्यमातून आता कोणत्याही भाषेतील मेल आपण सहजरित्या वाचू शकतो. कंपनीने हे फीचर ANDROID आणि IOS युजर साठी उपलब्ध केले आहे.
GMAIL वर उपलब्ध करण्यात आलेल्या मल्टी लॅंग्वेज ट्रांसलेट फीचरच्या माध्यमातून तुम्ही मेल 100 पेक्षा जास्त भाषांमध्ये ट्रांसलेट करू शकतात. गुगलने डेस्कटॉप वर्जन साठी अगोदरच हे फीचर लॉन्च केले होते. परंतु आता हेच फिचर अँड्रॉइड आणि IOS यूजर साठी रोलआऊट करण्यात आले आहे. हे फीचर लॉन्च करण्यामागे गुगलचा उद्देश हा युजर्स ला मदत करणे आहे. करून यूजर्सला मिळालेला मेल कोणत्याही भाषेत मध्ये असला तरीही ट्रान्सलेट करण्यास मदत होईल.
अशा पद्धतीने वापरा हे फीचर
1) सर्वात पहिले जीमेल ॲप ओपन करा.
2) यानंतर तुम्हाला जो ईमेल ट्रान्सलेट करायचा आहे त्यावर क्लिक करा. किंवा ओपन करा.
3) ओपन केल्यानंतर तुम्हाला ई-मेलच्या साईडला तीन डॉट दिसतील. त्यावर क्लिक करा.
4) त्यानंतर ट्रान्सलेट या ऑप्शन वर क्लिक करा.
5) आता तुम्हाला ट्रान्सलेट लैंग्वेज निवडावी लागेल.
6) त्यानंतर तुम्हाला तुमचा ईमेल हव्या त्या भाषेत मिळू शकतो.