पेट्रोल- डिझेलची चिंता सोडा; गाडीमध्ये ‘हे’ किट बसवा आणि आयुष्यभर फुकट प्रवास करा

टाइम्स मराठी । गेल्या काही वर्षांपासून महागाई प्रचंड वाढली आहे. दिवसेंदिवस ही महागाई कमी न होता वाढतच चालली आहे. अशातच पेट्रोल डिझेलचे भाव सामान्य नागरिकांच्या खिशाला आग लावत आहेत. पेट्रोल डिझेलच्या भाव वाढल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना ऑफिसला जाण्यासाठी बाईक किंवा स्कूटर चालवणे देखील आता न परवडणारे झाले आहे. यासोबतच ट्राफिक मध्ये बाईक सुरू असल्यास पेट्रोल जळते. आणि मायलेज देखील कमी मिळते. या सर्व कारणांमुळे बाईक चालवणं आता खूप महाग झाले आहे. पेट्रोल डिझेलचे भाव वाढल्यामुळे त्यावर उपाय म्हणून इलेक्ट्रिक वाहन उपलब्ध झाले आहेत. इलेक्ट्रिक वाहनांची प्रचंड प्रमाणात विक्री होत असली तरीही सर्वसामान्य नागरिकांना या इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती परवडणाऱ्या नाही. यावर उपाय म्हणून GoGoA1 कंपनीने एक किट लॉन्च केले आहे. हे किट तुम्ही तुमच्या बाईक किंवा स्कूटरला लावल्यास तुमची बाईक किंवा स्कूटर इलेक्ट्रिकमध्ये बदलेल.

   

मुंबईमध्ये असलेल्या इलेक्ट्रिक व्हेईकल स्टार्टअप GoGoA1 या कंपनीने पेट्रोल वाहनांना इलेक्ट्रिक व्हर्जन मध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी एक किट लॉन्च केला आहे. या किटच्या माध्यमातून कोणताही पेट्रोल वाल्या बाईज आणि स्कूटरचा आपण कायापालट करू शकतो. त्याचबरोबर या कंपनीने सांगितलं की आपल्याला हे किट लावल्यावर १५० किलोमीटर पर्यंत रेंज मिळू शकते. त्याचबरोबर आरटीओ कडून सुद्धा या किटला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे तुम्ही कायदेशीररित्या पेट्रोल दुचाकी इलेक्ट्रिक मध्ये बदलू शकता. या किटच्या किमती बद्दल आणि फीचर्स बद्दल अजून माहिती मिळाली नसून या कंपनीच्या वेबसाईटवरून आपण किमतींचा आणि फिचर चा अंदाज बांधू शकतो.

किंमत आणि स्पेसिफिकेशन

GoGoA1 कंपनीच्या या कन्वर्जन किटची किंमत होंडा एक्टिवा स्कुटर साठी 60000 रुपये एवढी आहे. यामध्ये हब मोटर साठी 19000 रुपये, 1.6 kwh LFP बॅटरी साठी 30000, इलेक्ट्रिक कंपोनंट साठी 5000, आणि चार्जर साठी पाच हजार रुपये द्यावे लागतात. म्हणजेच पूर्णपणे 60 हजार रुपयांमध्ये हे कीट आपल्याला उपलब्ध होऊ शकते. हे किट लावल्यानंतर आपल्याला 60 किलोमीटर पर्यंत रेंज मिळते. याशिवाय जर तुम्ही मोठी बॅटरी बाईक मध्ये लावली तर 151 किलोमीटर पर्यंत रेंज मिळू शकते. एवढेच नाही तर बाईक साठी कन्वजर किट ची किंमत 29,999 रुपये आहे.

GoGoA1 या कंपनीचे संस्थापक आणि सीईओ श्रीकांत शिंदे म्हणाले की, आपल्या देशामध्ये अत्याधुनिक इलेक्ट्रिक वाहन सोल्युशन्स आणणे हे फक्त नाविन्यपूर्ण नसून ते पर्यावरणाच्या दृष्टीने भविष्यासाठी उपयुक्त आहे. यासोबतच कंपनीने इलेक्ट्रिक स्कूटर भाड्याने देणे, सध्याच्या पेट्रोल टू व्हीलर चे रेट्रोफिकेशन करणे, कौशल्य निर्माण करणे, इलेक्ट्रिक वाहन इकोसिस्टीम साठी रोजगारक्षम पूल तयार करणे यासारख्या पर्यायांसह आम्ही वाहतुकीत बदल करण्याच्या दिशेने प्रवास सुरू केला आहे.

GoGoA1 या कंपनीने याबाबत माहिती देताना सांगितलं की, हे किट सध्या 50 पेक्षा जास्त टू व्हीलर ला सपोर्ट करत आहे. यामध्ये हिरो, होंडा, होंडाच्या गाड्यांचा आणि स्कूटरचा देखील समावेश असून एक्टिवा स्कूटर च्या पाच व्हेरिएन्ट देखील यामध्ये समाविष्ट आहेत. हे किट सहजरीत्या बाईक आणि स्कूटर मध्ये बसते. या सोबतच लॉंग बॅटरी लाईफ, सोपे इन्स्टॉलेशन यासारखे फीचर्स यामध्ये उपलब्ध आहे.