111 KM रेंजसह लाँच झाली ‘ही’ Electric Scooter

टाइम्स मराठी । इलेक्ट्रिक टू व्हीलर निर्माता कंपनी Gogoro ने नवी स्कुटर बाजारात लाँच केली आहे. क्रॉसओवर ई-स्कूटर असे या गाडीचे नाव असून ही इलेक्ट्रिक स्कुटर 3 व्हेरिएन्टमध्ये उपलब्ध असेल. यामध्ये GX 250, Crossover 50 आणि Crossover S या व्हेरियन्टचा समावेश आहे. या स्कुटरचे उत्पादन महाराष्ट्रातील औरंगाबाद येथे होणार आहे. आज आपण या Electric Scooter चे खास फीचर्स जाणून घेऊयात.

   

फीचर

मिळालेल्या माहितीनुसार, ही अपकमिंग स्कूटर अल्टिमेट टू व्हीलर SUV आहे. ही टिकाऊ इलेक्ट्रिक स्कूटर मोठ्या बॉडी पॅनल, एक स्प्लिट टाईट सीट आणि फ्लोर बोर्ड सह उपलब्ध झाली आहे. यातील फ्लोर बोर्डच्या माध्यमातून सामान आणण्यासाठी मदत होईल. ही इलेक्ट्रिक स्कूटर जास्त स्पेस गरजेचा असलेल्या ग्राहकांसाठी अप्रतिम आहे.

111 KM रेंज

या इलेक्ट्रिक स्कुटरमध्ये 2.5 kW मिड-ड्राइव्ह मोटर वापरण्यात आली आहे. तर क्रॉसओवर 50 मध्ये 5kW हब मोटर आहे आणि S मध्ये 6.4 W मोटर आहे. या इलेक्ट्रिक स्कुटरमध्ये 1.6 kWh बॅटरी पॅक बसवण्यात आलं असून एकदा फुल्ल चार्ज केल्यानंतर ही गाडी तब्बल 111 किलोमीटर पर्यंत अंतर पार करेल असा दावा कंपनीने केला आहे. तसेच तिचे टॉप स्पीड 60 किलोमीटर प्रति तास इतक असू शकते.

ॲडव्हान्स फीचर-

या इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये क्रॉसओव्हर LTE स्मार्ट रिमोट नेटवर्किंग सेवा , ब्लूटूथ कंट्रोल , नवीन ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टीम, क्रूज कंट्रोल मोड यासारखे ऍडव्हान्स फीचर्स देण्यात आले आहेत. क्रॉसओव्हर LTE स्मार्ट रिमोट नेटवर्किंग या फीचरच्या माध्यमातून रायडरला 24 तासांपर्यंत सूचना प्रदान करण्यात येईल. यासोबतच रिमोट कमांड आणि कंट्रोल सोबतच आणखीन कनेक्टिव्हिटी फीचर्स देखील यामध्ये मिळतील. .ई-स्कूटरच्या पुढील बाजूस टेलिस्कोपिक फोर्क आणि मागील बाजूस ट्विन शॉक सेटअप आहे. ब्रेकिंगसाठी, दोन्ही बाजूंना डिस्क ब्रेक दिलेले आहेत. या इलेक्ट्रिक स्कुटरची पेलोड क्षमता 200 kg पर्यंत असून या स्कुटरला 176 mm ग्राउंड क्लीयरन्स मिळतो.