Good News!! मोबाईल, लॅपटॉप, TV झाला स्वस्त; इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किमतींमध्ये मोठी घसरण, 80% OFF?

टाइम्स मराठी टीम : तुम्ही यंदा दिवाळी मध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तू विकत घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला बजेटचा विचार करण्याची गरज नाही. कारण काही इलेक्ट्रॉनिक वस्तूंची मागणी कमी झाल्यामुळे आता इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होऊ शकतात. यामध्ये टीव्ही, मोबाईल, लॅपटॉप या वस्तूंचा समावेश असून यासह अनेक इलेक्ट्रिक वस्तू स्वस्त होणार आहेत.

   

कोरोना महामारीच्या काळात सर्वच कंपन्यांचे, कारखान्याचे नुकसान झालं. त्यावेळी कारखान्यातून येणारा माल कमी झाला. पण आता सर्व पूर्वपदावर आलेलं आहे. त्यामुळे कंपनीने या वस्तूंच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. इलेक्ट्रॉनिक कंपन्या यंदा दिवाळीला कमी किमतीमध्ये टीव्ही, मोबाईल, लॅपटॉप विकू शकतात. कोविड महामारीच्या काळात चीन मधून कंटेनर पाठवण्यात आला तेव्हा त्याची किंमत 8 हजार डॉलर इथपर्यंत पोहोचली होती. परंतु आता त्यामध्ये घट होऊन 850 डॉलर ते 1000 डॉलर पर्यंत घसरले आहे.

कोरोना काळामध्ये सेमीकंडक्ट चिप ची किंमत सुद्धा कमी झाली. एवढेच नाही तर इलेक्ट्रॉनिक कंपोनेंट्स ची किंमत 60 ते 80 टक्के घटली आहे. या इलेक्ट्रॉनिक वस्तूंची डिमांड कमी झाल्यामुळे त्यांच्या किमतीमध्ये देखील घसरण झाली आहे. पण आता सणासुदीच्या काळात कंपन्या ऑफरमध्ये वस्तू विकून प्रॉफिट मिळवू शकतात.

इलेक्ट्रॉनिक कंपनीचे ब्रँड हायर इंडिया चे चेअरमन सतीश एनएस म्हणाले की, इलेक्ट्रॉनिक वस्तूंची मागणी कमी झाल्यामुळे या वस्तू पाठवण्यासाठी कंटेनर भरता आला नाही. त्यामुळे या परिस्थितीत काही ठिकाणी अर्जंट माल पाठवायचा असेल तर मालवाहतूक चालक एक्स्ट्रा पैसे घेतात. त्यामुळे प्रचंड नुकसान होते. 2021-22 मध्ये सरासरी विक्री किंमत 16 हजार 400 होती तर ती यावर्षी 2022-23 मध्ये घटून 11 हजार 500 झाली आहे.