या मोबाईल मध्ये मिळणार Google चे गुगलचे AI Assistant

टाइम्स मराठी । बऱ्याच एप्लीकेशनमध्ये आणि गुगलमध्ये देखील आर्टिफिशल इंटेलिजंटचा वापर होत आहे. गुगलचे जनरेटिव्ह AI चॅटबॉट आणि ChatGPT सोबत स्पर्धा करणाऱ्या बार्डमध्ये गुगल नवीन फीचर ऍड करणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. ही घोषणा मागच्या काही दिवसांपूर्वी न्यूयॉर्कमध्ये झालेल्या मेड बाय गुगल इव्हेंट मध्ये करण्यात आली होती. यासोबतच या इव्हेंट मध्ये गुगलचा पिक्सेल 8 सिरीज स्मार्टफोनच्या अनावरण देखील करण्यात आले होते. या इव्हेंट मध्ये गुगलने एआय चॅटबॉट बार्ड च्या माध्यमातून नवीन गुगल असिस्टंट  उपलब्ध होणार असल्याची देखील माहिती दिली होती. आता गुगलने सर्वात आधी हे फीचर कोणत्या स्मार्टफोन मध्ये उपलब्ध करण्यात येणार आहे याबाबत माहिती दिली.

   

या स्मार्टफोनमध्ये उपलब्ध होणारे AI असिस्टंट

या गुगल असिस्टंटची कार्यक्षमता जास्त असणार आहे. माहिती, महत्वाचे काही  डिटेल्स, ट्रीप प्लॅन, मेसेज सेंड करण्यासाठी  बऱ्याच कामांमध्ये हे फीचर मदत करेल. मागच्या आठवड्यामध्ये  ए आय असिस्टंट चे अनावरण करा गुगलने  पुढच्या महिन्यात काही स्मार्टफोन मध्ये हे गुगल असिस्टंट फीचर उपलब्ध करण्यात येईल याची माहिती दिली होती. त्याचबरोबर हे एक ऑफ इन एक्स्पिरियन्स असेल. आता हे गुगल AI असिस्टंट गुगलचा PIXEL 8 आणि GALAXY S24 सिरीज मध्ये उपलब्ध करण्यात येणार आहे.

सॅमसंग गॅलेक्सी S24 मध्ये देखील मिळेल AI Assistant

मिळालेल्या माहितीनुसार, हे नवीन AI Assistant सर्वात आधी PIXEL 8, PIXEL 8 PRO आणि अपकमिंग सॅमसंग गॅलेक्सी  S24 सिरीज मध्ये उपलब्ध करण्यात येणार आहे. त्याचबरोबर PIXEL च्या जुन्या मॉडेल मध्ये  आणि नवीन गॅलेक्सी  S23 सिरीज मध्ये देखील google चे नवीनAI Assistant उपलब्ध करण्यात येऊ शकते. गुगलचे हे नवीन असिस्टंट सर्च जनरेटर एक्सपिरीयन्स SGE सह गुगल लॅब्स सॅमसंग चा देखील एक पार्ट असेल.

google चा PIXEL 8 स्मार्टफोन

गुगलने नुकतीच पिक्सेल 8  सिरीज लॉन्च केली. पिक्सल 8 आणि पिक्सल 8 प्रो या दोन्ही स्मार्टफोन मध्ये  6.17 इंच चा डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 120 hz रिफ्रेश रेट प्रदान करतो. या दोन्ही स्मार्टफोन मध्ये  टेन्सर G3 प्रोसेसर देण्यात आला असून हे दोन्ही स्मार्टफोन अँड्रॉइड 14 ऑपरेटिंग सिस्टीम वर काम करतात. पिक्सल 8 मध्ये 50 मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा, 12 मेगापिक्सेल अल्ट्रा वाईड सेंसर, टाइम ऑफ फ्लाईट सेन्सर  देण्यात आले आहे. आणि पिक्सेल 8 प्रो मध्ये 64 एमपी प्रायमरी कॅमेरा, 64 मेगापिक्सल अल्ट्रावाईड कॅमेरा, 49 mp टेलीफोटो कॅमेरा देण्यात आला आहे.