Google AI Course : Google ने सुरु केले Free AI Certificate कोर्स; पहा कोणकोणते कोर्स आहेत?

Google AI Course । आजकाल प्रत्येक ठिकाणी तुम्ही आर्टिफिशियल इंटेलिजंटचे नाव ऐकले असेल. न्यूज चैनल, सॉफ्टवेअर कंपन्या, गुगल, ॲप्स अशा बऱ्याच क्षेत्रात आता आर्टिफिशल इंटेलिजंट म्हणजेच AI द्वारे काम करण्यात येत आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा दिवसेंदिवस वाढणारा वापर आणि  आर्टिफिशियल इंटेलिजंटची डिमांड पाहता बऱ्याच एज्युकेशनल संस्थांनी AI कोर्स  उपलब्ध केले आहेत. या कोर्सच्या माध्यमातून तरुण पिढीला या क्षेत्रासाठी तयार करण्यात येत आहे. आता गुगलने देखील युजर साठी काही Free AI Certificate कोर्स लॉन्च केले आहेत.

   

गुगलने लॉन्च केलेल्या काही फ्री एआय कोर्सला (Google AI Course) ऑनलाइन मोडमध्ये एक्सेस केल जाऊ शकतो. त्याचबरोबर हे फ्री एआय कोर्स यूजरसाठी अप्रतिम आणि महत्वाचे ठरू शकतात. एवढेच नाही तर गुगलच्या फ्री एआय कोर्स चे सर्टिफिकेट देखील देण्यात येणार आहे. हे सर्टिफिकेट युजर्स  RESUME मध्ये देखील ऍड करू शकतात. त्यानुसार युजर्स ला चांगल्या सॅलरी सह नोकरी देखील मिळू शकते. याच गुगलच्या फ्री एआय कोर्स बद्दल आपण आज जाणून घेणार आहोत.

1) जनरेटिव्ह AI

आज काल आर्टिफिशियल इंटेलिजन्स च्या माध्यमातून सर्व कामे हे सोप्या पद्धतीने केली जात आहेत. आर्टिफिशल इंटेलिजन्ट फोटो एडिट करण्या पासून अँकरिंग, स्क्रिप रायटिंग सर्व प्रकारचे काम करते. जनरेटिव्ह एआय मध्ये तुम्ही जेनेरिक टूल्स चा वापर करून पेस्ट आणि फोटो यासारखे बरेच मीडियावर एक्सपेरिमेंट करता येतात.

2) लार्ज लैंग्वेज मॉडेल– Google AI Course

लार्ज लैंग्वेज मॉडेल हा कोर्स सध्या डिमांड मध्ये आहे. यासोबतच बऱ्याच क्षेत्रांमध्ये या कोर्सच्या माध्यमातून काम करता येते. लार्ज लैंग्वेज मॉडेल हे एक डीप लर्निंग अल्गोरिदम आहे. यामध्ये ट्रान्सफॉर्मर मॉडेलचा वापर करण्यात येतो. त्याचबरोबर बरेच डेटा सेट्सचा एकत्रित वापर करून टेक्स्टर आणि दुसरे कंटेंट ओळखणे सोपे होते. यासोबतच ट्रान्सलेट आणि जनरेट करण्यासाठी देखील मदत होते.

3) इमेज जनरेटर एआय

इमेज जनरेटर AI च्या माध्यमातून कमी रिझर्वेशन असलेला फोटो हाय क्वालिटी इमेज मध्ये कन्व्हर्ट करता येते. यासोबतच कोणताही चेहरा डिझाईन करण्यापासून लँडस्केप इमेज डेव्हलप करण्यापर्यंत इमेज जनरेटर एआय चा वापर होतो.

4) इमेज कॅप्शनिंग मॉडेल

एखादा फोटोला कॅप्शन द्यायचे असेल तर इमेज कॅप्शनिंग एआय चा वापर करता येतो. त्यानुसार तुम्ही एखाद्या फोटोवर कॅप्शन दिल्यानंतर फोटोला वजन येते. या इमेज कॅप्शनिंग मॉडेल कोर्समध्ये  तुम्हाला टेक्नॉलॉजीच्या मदतीने फोटो वर कॅप्शन देणे शिकवले जाते.