टाइम्स मराठी । बऱ्याच एप्लीकेशन मध्ये आणि गुगलमध्ये देखील आर्टिफिशल इंटेलिजंटचा वापर होत आहे. अशातच गुगलचे जनरेटिव्ह AI चॅटबॉट आणि चॅट GPT सोबत स्पर्धा करणाऱ्या BARD मध्ये गुगल नवीन फीचर ऍड करणार आहे. जेणेकरून तुमची माहिती, महत्वाचे काही डिटेल्स या बार्ड मध्ये उपलब्ध असतील. गुगल बार्ड मध्ये उपलब्ध करत असलेल्या फीचर्सचे नाव मेमरी फीचर असे आहे. हे मेमरी फीचर AI चॅटबॉट ला तुम्ही दिलेली माहिती किंवा तुम्ही शेअर करत असलेले डिटेल्स मेमरी फीचर च्या माध्यमातून जपून ठेवेल. किंवा माहिती साठवून ठेवेल. म्हणजेच जेव्हा तुम्ही एखाद्या प्लेस वर किंवा सुट्टीसाठी जाणार असाल तर तुम्हाला भरावी लागणारी माहिती बार्ड लक्षात ठेवेल.
समजा तुम्ही नॉनव्हेज खात नाही, तुम्हाला दोन मुलं आहेत याबाबतची माहिती तुम्हाला पुन्हा पुन्हा भरावी लागणार नाही. ही माहिती मेमरी मध्ये ऍड राहील. या मेमरी फीचर मध्ये तुम्ही नवीन नवीन माहिती जोडू शकतात. या फिचर मध्ये ऍड झालेल्या काही आठवणी हटवण्याची तुम्हाला परवानगी देण्यात येईल. ही माहिती गुप्त ठेवण्यासाठी स्किनच्या डाव्या साईडने एक टॉगल तुम्हाला बार्डची मेमरी लवकर मिनिमाईज करण्याचे ऑप्शन देईल. जेणेकरून तुमची माहिती सिक्युअर राहील.
या मेमरी फीचरच्या माध्यमातून तुमच्या आठवणी नोंदणीकृत राहतील. बऱ्याच वर्षानंतर जर तुम्ही चॅट बॉट ला एखाद्या विषयाबद्दल विचारले असता तुम्हाला याबद्दल माहिती मिळेल. कारण तुम्ही ऍड केलेली एखादी माहिती जी तुम्ही पूर्णपणे विसरले आहात ती माहिती तुम्हाला मिळेल. यासोबतच कंपनीने गुगल इट सुविधांमध्ये देखील बरेच बदल केले आहे. जेणेकरून तुम्ही तुमच्या ट्रॅव्हल पॉईंट पर्यंत व्यवस्थित पोहोचू शकाल.