टाइम्स मराठी । कोणताही प्रश्न असो, किंवा कोणतीही अडचण असो. आपल्याला पहिले डोळ्यासमोर येते ते गूगल. गूगल हे जगातील सर्वात मोठी सर्च इंजिन आहे. आता ह्याच गूगलने इंग्रजी आणि हिंदीतील पहिले AI सर्च टूल आणले आहे. Google ने भारत आणि जपानमधील यूजर्ससाठी आपल्या सर्च टूलमध्ये जनरेटिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) सादर केले आहे. गुगलने त्यामध्ये काही फीचर्सचा समावेश केला आहे. ज्यामुळे सर्च पूर्वीपेक्षा अधिक सहज आणि स्मार्ट होईल असं कंपनीचं म्हणणं आहे. याआधी ही सुविधा फक्त अमेरिकेत सुरू करण्यात आली होती.
काय आहेत ह्याची वैशिष्ट्य
जे वापरकर्ते सर्च लॅब्सच्या माध्यमातून फीचरची चाचणी करण्यासाठी साइन अप करतील ते वापरकर्ते क्रोम आणि गुगल अॅपवर अॅक्सेस करू शकणार आहेत. मात्र गुगलवर पूर्वीसारखे सर्च करणे सुरूच राहणार आहे. जनरेटिव्ह AI ची ताकद म्हणजे ते थेटपणे गुगल सर्चमध्ये पूर्णपणे नवीन प्रकारांच्या प्रश्नांना परवानगी देते ज्याबद्दल तुम्ही कधी विचार केला नसेल की सर्च केल्यानंतर हे उत्तर आपल्याला मिळू शकेल. तसेच माहिती सांगण्यासाठी पद्धत बदलते ज्यामुळे तुम्हाला तेथे काय आहे ते समजून घेण्यास मदत मिळणार आहे.
कसे करेल काम
भाषा टॉगल बटण टॅप करून एखादी व्यक्ती इंग्रजी भाषेवरून हिंदीमध्ये स्विच करू शकते आणि ‘ऐका’ बटण निवडून टेक्स्ट-टू-स्पीचसह आलेलं उत्तर ऐकू देखील शकते. Google देखील एक फीचर्स रोल आउट करण्याचा विचार करीत आहे जे लोकांना टाइप करण्याऐवजी फॉलो- अप प्रश्न विचारण्यासाठी संवादात्मक मोडमध्ये मायक्रोफोन चिन्ह टॅप करण्यास अनुमती देईल.
नवीन वापरकर्त्यांना सुरक्षेचे पर्याय उपलब्ध – पुणेश कुमार
गूगल सर्चचे जनरल मॅनेजर म्हणतात की “नवीन फीचरमध्ये वापरकर्त्यांसाठी सुरक्षेचा पर्याय देखील समाविष्ट करण्यात आलेला आहे. हे फिचर प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी स्नॅपशॉट तयार करत असले तरी देखील ज्यांना सर्व माहिती अगदी तपशीलवार वाचायची आहे त्यांच्यासाठी मुख्य स्रोत समोर ठेवणार आहे.”
येत्या आठवड्यात Android आणि iOS वर होईल उपलब्ध
सर्च लॅबमध्ये प्रयोग म्हणून एसजीई आणत असल्याचे कंपनीने म्हटले आहे. ते निवडलेल्या वापरकर्त्यांसाठी 31 ऑगस्ट पासून Chrome डेस्कटॉपवर आणि येत्या आठवड्यात Android आणि iOS वर Google App वर उपलब्ध आहे . यूजर्स उत्पादनावर काम करणार्या टीमशी थेट फीडबॅक शेअर करू शकतात.