खोटा फोटो दाखवून फसवणूक होणार नाही; Google ने आणलं फॅक्ट चेक टूल फीचर्स

टाइम्स मराठी । सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सोबतच सर्च इंजिन म्हणजेच Googe देखील  वेगवेगळे फीचर्स लॉन्च करत आहे. आता गूगलने कोणत्याही इमेजची सत्यता चेक करण्यासाठी नवीन फीचर टूल लॉन्च केले आहे. या फीचर टूलच्या माध्यमातून युजर्स फोटो बद्दल खरी माहिती मिळवू शकतात. हे टूल ऑनलाइन  इमेज ची विश्वसनीयता आणि  रेफरन्सची माहिती ग्राहकांना सोप्या पद्धतीने मिळवून देऊ शकतात. या नवीन फीचर टूल चे नाव फॅक्ट चेक टूल असे आहे. (Image Fact Check Tool)

   

काय आहे हे फिचर

फॅक्ट चेक टूल या फीचरच्या माध्यमातून युजर्स  google वर इमेज सर्च करून इमेज चा इतिहास रेफरन्स जाणून घेऊ शकतात. ज्याप्रमाणे आपण गुगलवर  एखाद्या विषयाची माहिती हवी असेल तर त्यासंदर्भात  काही वाक्य किंवा नाव टाकतो, त्याचप्रकारे आता गुगलवर इमेज सर्च केल्यानंतर तुम्हाला इमेज ची संपूर्ण माहिती मिळेल. या टूल च्या माध्यमातून एखादी इमेज किंवा त्याचप्रमाणे दिसणारी दुसरी इमेज गुगल सर्चच्या माध्यमातून पहिल्यांदा केव्हा पाहिली गेली होती, याबाबत देखील माहिती मिळेल. यासोबतच  तुम्ही सर्च केलेली इमेज यापूर्वी वेब पेजवर पब्लिश करण्यात आली होती की नाही याबद्दल देखील माहिती मिळू शकते.

यासाठी करता येऊ शकतो फीचर्स चा वापर

या फॅक्ट चेक टूल च्या माध्यमातून  युजर्सने सर्च केलेल्या इमेज चा वापर दुसऱ्या पेजवर कशा पद्धतीने केला जाईल. यासोबतच न्यूज आणि फॅट चेकिंग वेबसाईटचे या इमेज बाबत काय म्हणणे आहे हे देखील आपल्याला समजू शकते. गुगल नुसार, एखाद्या इमेज  बद्दल करण्यात येणाऱ्या दाव्यांचे आकलन करणे आणि  काही सोर्सच्या माध्यमातून एव्हिडन्स आणि परस्पेक्टिव्ह जाणून घेण्यासाठी या फीचर्स चा वापर होऊ शकतो.