Google Chat ने लाँच केलं Workday App; असं करेल वर्क

टाइम्स मराठी । आजकाल सोशल मीडिया एप्लीकेशन वेगवेगळ्या प्रकारचे अपडेट्स आणि फीचर्स आणत असतात. या नवीन अपडेट्स आणि फीचर्स मुळे युजर्स ला मोठ्या प्रमाणात फायदा होत असतो. त्याचबरोबर युजर्स ला चांगला अनुभव येण्यासाठी देखील हे फीचर्स कामात येतात. आता गुगलने एक नवीन फिचर युजर साठी लॉन्च केले आहे. हे फीचर खास करून गुगल चॅट (Google Chat) वापरणाऱ्यांसाठी आहे.

   

काय आहे हे फीचर

Google ने विकसित केलेली एक कम्युनिकेशन सेवा म्हणून गुगल चॅटकडे बघितले जाते. सुरुवातीला हे गुगल चॅट ग्रुप आणि व्यावसायिक वातावरणासाठी डिझाईन करण्यात आले होते. त्यानंतर ते सर्वसामान्य ग्राहकांसाठी उपलब्ध करण्यात आले. आता सर्वसामान्य नागरिकांना याचा आणखीन लाभ होण्यासाठी गुगलने गुगल चॅट साठी नवीन Workday App लॉन्च केले आहे. गुगलच्या या कम्युनिकेशन ॲप मध्ये यूजर ला चॅटिंग वेळी क्विक ऍक्शन सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात.

या वर्क डे ॲप मध्ये यूजर्सला टाईम ऑफ, एक्सप्रेस रिपोर्ट ही सर्व माहिती ॲड करता येईल. गुगलने हे फीचर खास करून व्यावसायिक वापरकर्त्यांसाठी लॉन्च केलेले आहे. त्याचबरोबर अपकमिंग गुगल वर्क स्पेस अपडेट सह हे ॲप युजर साठी रिलीज करण्यात येऊ शकते. यावर्षी गुगलने अनेक सर्विसेस मध्ये इम्प्रूमेंट करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानुसार आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा वापर घेण्यात येत आहे.

ब्लॉग पोस्ट करून दिली माहिती

या ॲप मध्ये देण्यात आलेल्या फीचर्स बाबत टेक कंपनीने ब्लॉक पोस्ट करून माहिती दिली. त्याचबरोबर गुगलने देखील आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये सांगितलं की, गुगल चॅटमध्ये वर्क डे ॲप जोडले जाणार आहे. या ॲपमुळे युजर्स ला वर्क डे मध्ये क्विक ऍक्शन परफॉर्मन्स देता येईल. या क्विक ऍक्शन मध्ये टाइम ऑफ, एक्सपेंस रिपोर्ट, कलिंग इन्फॉर्मेशन म्हणजेच ऑफिस मधील सहकाऱ्यांची माहिती हे सर्व गुगल चॅट मध्ये उपलब्ध होईल. यामुळे गुगल वर्कस्पेस वापरणाऱ्या युजर्सला जास्त वेगाने काम करण्यासाठी मदत होईल.

त्याचबरोबर गुगलने सांगितलं की, एडमिन कन्सोलजवळ या ॲप चे सर्व राइट्स असतील. म्हणजेच कोणता युजर्स वर्क डे ॲप इंस्टॉल करू शकतो याचा अधिकार फक्त ॲडमिन कन्सोललाच असेल. गुगल चॅटचॅटचे हे फिचर मोठ्या प्रमाणात मायक्रोसॉफ्ट टीम ने इन्स्पायर्ड असल्याचं दिसून येतं. त्याचबरोबर लवकरच हे ॲप युजर्सला गुगल अकाउंट मध्ये दिसू शकते. वर्क स्पेस सोबतच आणखीन एक नवीन फिचर जोडण्यात आले आहे. त्यानुसार यूजर्स मेसेज चे व्यू काउंट देखील तपासू शकतात.