टाइम्स मराठी । कोणतीही गोष्ट सर्च करण्यासाठी बरेच युजर्स Google Chrome चा वापर करतात. क्रोम ब्राउझरच नाही तर स्मार्टफोन मध्ये उपलब्ध असलेले गुगलच्या काही सर्विसेसचा देखील मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. परंतु आता या ॲप्लिकेशनचा आणि Google Chrome चा वापर करणाऱ्या अँड्रॉइड युजर साठी महत्वाचे अपडेट आहे. लवकरच अँड्रॉइड स्मार्टफोनवर गुगलचे काही एप्लीकेशन काम करणे बंद करणार आहे. जेणेकरून युजर्सला अँप अपडेट्स मिळू शकणार नाही.
यामुळे मिळणार नाही अपडेट
गुगल हे सर्च इंजिन जुने अँड्रॉइड वर्जन रिलीज झाल्यानंतर बऱ्याच वर्षांपर्यंत सपोर्ट करतो. परंतु जुन्या व्हर्जन ला सपोर्ट करणे हे डेव्हलपर्सला परवडत नाही. जुन्या वर्जनला सपोर्ट केल्यामुळे यामध्ये बराच वेळ जातो आणि ते महाग देखील आहे. त्यामुळे बऱ्याच स्मार्टफोन मध्ये नवीन ॲप चालवण्यासाठी प्रोसेसिंग पावर नसते. त्यामुळे गुगल आता जुन्या अँड्रॉइड वर्जन चा वापर करणाऱ्या स्मार्टफोन युजर साठी सपोर्ट बंद करणार आहे.
या युजर्सला मिळणार नाही अपडेट
गुगलकडून ANDROID NOUGAT 7.1 हे व्हर्जन असलेल्या युजरसाठी गुगल कॅलेंडर आणि क्रोम सपोर्ट मिळणार नाही. यासोबतच ज्या युजरच्या स्मार्टफोन मध्ये अँड्रॉइड 11 हे व्हर्जन उपलब्ध आहे. अशा वर्जन ला गुगल सपोर्ट करेल परंतु अँड्रॉइड 11 पेक्षा जुन्या वर्जनला गुगल सपोर्ट करणार नसल्याची माहिती उघड झाली आहे. यानुसार युजर्स ला आता क्रोम सपोर्ट देखील मिळणार नसून जुन्या वर्जन मध्ये CHROME V1 19 हे अंतिम अपडेट असेल.
तुम्ही वापरत असलेल्या स्मार्टफोनमध्ये कोणते अँड्रॉइड व्हर्जन आहे हे तुम्हाला माहीत नसेल, किंवा जाणून घ्यायची असेल पुढील प्रोसेस फॉलो करा.
1) सर्वात आधी स्मार्टफोनच्या सेटिंग मध्ये जा.
2) सेटिंग मध्ये गेल्यानंतर अबाउट फोन मध्ये जा.
3) यानंतर तुम्हाला स्मार्टफोन मध्ये उपलब्ध असलेल्या अँड्रॉइड वर्जनची माहिती दिसेल.
4) हे अँड्रॉइड वर्जन ANDROID 8.0 पेक्षा कमी नसले पाहिजे.