Android 14 सह Google ने लॉन्च केले नवीन फीचर; अलार्म वाजल्यानंतर फोनच्या स्क्रीनवर दिसणार हवामानाची माहिती

टाइम्स मराठी । Google ने पिक्सल 8, पिक्सल 8 Pro आणि गुगल पिक्सल वॉच 2 लॉन्च केल्यानंतर अँड्रॉइड 14 ही ऑपरेटिंग सिस्टीम लॉन्च करणार असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर सॉफ्टवेअर पिक्सल 8, पिक्सल 8 pro या स्मार्टफोन मध्ये उपलब्ध करण्यात आले. आता कंपनी या अँड्रॉइड 14 ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये वेगवेगळे फीचर्स वर काम करत आहे. यापैकी काही फीचर्सचा खुलासा करण्यात आला आहे. या सॉफ्टवेअर सोबत गुगल क्लॉक वेदर इंटिग्रेशन यासारखे फीचर्स ॲड करण्यात येत आहे.

   

गुगल क्लॉक या नवीन फीचर्स सोबतच वेदर इंट्रीगेशन हे फीचर उपलब्ध करण्यात येणार आहे. या फीचर अपडेट नंतर युजरला वेदर सर्विस अलार्म फॉरकास्ट सुविधा मिळेल. म्हणजेच अलार्म वाजल्यानंतर पिक्सेल डिवाइस मध्ये फुल स्क्रीन क्लायमेट कंट्रोल अपडेट मिळेल. त्याचबरोबर युजर्सला प्रेझेंट टेंपरेचर सह दिवसभराचे तापमान देखील समजेल. हे गुगल क्लॉक 7.6 वेदर इंटिग्रेशन फीचर सर्व युजर साठी उपलब्ध नसून गुगल पिक्सेल 8 सिरीज आणि अँड्रॉइड 14 वर चालणाऱ्या स्मार्टफोन साठी उपलब्ध आहे.

हे नवीन वेदर फीचर वापरण्यासाठी सर्वात अगोदर क्लॉक या टॅब मध्ये जा. क्लॉक टॅब मध्ये युजर्स ला प्रेझेंट टेंपरेचर सह मिनिमम आणि मॅक्झिमम टेंपरेचर याची माहिती दिसेल. त्यानंतर ऍड लोकल वेदर हे ऑप्शन दिसेल. यावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर लोकल ऍड्रेस साठी तुम्हाला लोकेशन परमिशन द्यावी लागेल. जर तुमच्या google पिक्सल 8 सिरीज फोन मध्ये  हे फीचर दिसत नसेल तर  गुगल क्लॉक 7.6 अपग्रेड करा त्यानंतर तुम्हाला स्मार्टफोनच्या स्क्रीनवर क्लॉक आणि वेदर दोन ऑप्शन दिसतील.