तुम्हीही Google Drive वापरताय? लवकरच बदलणार हा नियम

टाइम्स मराठी । स्मार्टफोन मध्ये डॉक्युमेंट सेव्ह करून ठेवण्यासाठी बऱ्याचदा Google Drive चा वापर केला जातो. Google Drive हे फाईल स्टोअर करून ठेवण्यासाठी गुगलने सुरू केलेली एक सर्व्हिस आहे. ही सर्विस क्लाऊड कॉम्प्युटिंग टेक्नॉलॉजीवर आधारित आहे. याच्या माध्यमातून फाईल शेअरिंग देखील करता येतात. एवढेच नाही तर तुम्ही 5 GB पर्यंत डेटा किंवा फाईल सेव्ह करून ठेवू शकतात. परंतु आता गुगल ड्राईव्हने एक घोषणा केली आहे. या घोषणेनुसार आता 2 जानेवारी 2024 पासून गुगल ड्राईव्ह मध्ये फाईल डाऊनलोड करण्यासाठी थर्ड पार्टी कुकीजची गरज भासणार नाही.

   

म्हणजेच आता गूगल ड्राईव्ह मध्ये प्रायव्हसीची चिंता भासणार नाही. परंतु थर्ड पार्टी कुकीज हटवल्यामुळे गुगल ड्राईव्हमध्ये यूजर्सचे डिव्हाईस आणि ब्राउझिंग ऍक्टिव्हिटीज ट्रॅक करता येणार नाही. याबाबत कंपनीने सांगितले की गुगल ड्राईव्हला थर्ड पार्टी कुकीजची आवश्यकता नसून 2 जानेवारी पासून विदाऊट कुकीज डाउनलोडिंग सर्विस सुरू करण्यात येणार आहे.  ज्या युजर्स कडे ड्राईव्ह चे डाउनलोडिंग URL आहे, जे URL स्पेसिफिक वर्क फ्लो ला रिले करेल, त्या युजर्सला Google Drive आणि डॉग्स पब्लिशिंग फ्लोवर स्विच करावे लागणार आहे.

या युजर्सला होईल फायदा

Google Drive सोबतच गुगल क्रोम ब्राउझरमध्ये डिफॉल्टच्या माध्यमातून थर्ड पार्टी कुकीजला डिसेबल करण्याची तयारी करत आहे. गुगल ड्राईव्ह मध्ये थर्ड पार्टी कुकीज हटवल्यानंतर युजर्सच्या फाईल सुरक्षित राहू शकतील आणि प्रायव्हसी मध्ये देखील सुधारणा होईल. यानंतर वर्कस्पेस फाईल म्हणजेच google डॉक्युमेंट, शीट्स, स्लाईट्स, फॉर्म या सर्व फाईल साठी गुगल डॉक्स पब्लिशिंग URL चा वापर करण्यात येणार आहे. हा बदल गूगल च्या सर्व वर्कस्पेस, कस्टमर आणि पर्सनल गुगल अकाउंट वाल्या गुगल ड्राईव्ह युजरसाठी करण्यात येत आहे.