Google Grammar Check : गुगल सर्चने आणले नवीन फिचर, आता चुकलेली वाक्यरचना सुधारता येणार

टाइम्स मराठी (Google Grammar Check)। आजकाल सोशल मीडिया एप्लीकेशन वेगवेगळ्या प्रकारचे अपडेट्स आणि फीचर्स आणत असतात. त्याच प्रकारे आता गुगल सर्च इंजिनने देखील एक खास नवीन फिचर आणले आहे. या फिचरच्या माध्यमातून आता वाक्यांची व्याकरणाची अचूकता समजू शकेल. या फिचरचं नाव ग्रामर चेक फिचर असं आहे . युजरचा अनुभव वाढवण्यासाठी हे फिचर लॉन्च करण्यात आले आहे. नवीन फीचर युजर्सला त्यांच्या वाक्यांची आणि व्याकरणाची अचूकता समजावी यासाठी हे फिचर काम करते. या फिचरच्या माध्यमातून फक्त व्याकरण करेक्शनच केलं जात नाही तर चुकीचे वाक्य असल्यास युजर्सला आवश्यक माहिती देखील दिली जाते. आणि वाक्यांच्या रचनेचे विश्लेषण देखील केले जाते.

   

AI ची मदत घेऊन गुगल करणार ग्रामर चेक- Google Grammar Check

आजकाल आर्टिफिशियल इंटेलिजंट चा वापर बऱ्याच ठिकाणी होताना दिसत आहे. त्याच प्रकारे बरेच अँप्लिकेशन्स मध्ये देखील आता आर्टिफिशियल इंटेलिजंट वापरण्यात येत असल्यामुळे काही गोष्टी सहज आणि सोप्या होत आहेत. त्याच प्रकारे गुगलने देखील आता आर्टिफिशियल इंटेलिजंट वापरण्यास सुरुवात केली आहे. या आर्टिफिशियल इंटेलिजन्स च्या माध्यमातून हे गुगलने आणलेले नवीन फिचर काम करणार आहे.युजर्स ने दिलेल्या वाक्यांमध्ये काही शुद्धलेखनाच्या चुका असतील किंवा त्रुटी आढळल्यावर गुगलचे आर्टिफिशल इंटेलिजंट चलित व्याकरण तपासक फक्त वाक्य सुधारणा करणार नाही तर केलेले बदल निदर्शनास देखील आणून देतील. त्याचबरोबर युजर्स दुरुस्त केलेले हे वाक्य कॉपी करून देखील वापरू शकतात. एवढेच नाही तर ज्यावेळी तुमच्या व्याकरणांमध्ये एकही चूक सापडणार नाही तेव्हा तुम्हाला ग्रीन चेक मार्क दिला जाते.

गुगलने आणलेले ग्रामर चेकिंग (Google Grammar Check) टूल फिचर ऍक्टिव्ह करण्यासाठी तुम्हाला गुगल वर ‘grammar cheak’ ‘ cheak grammer ‘किंवा ‘grammer checker’ हे इनपुट टाकावे लागेल. ग्रामर चेकर हे यापूर्वी देखील उपलब्ध होते. परंतु ते फक्त इंग्रजी ग्रामरवर काम करत होते. आता यामध्ये मराठी देखील ऍड करण्यात आले आहे. गुगलने जीमेल google ड्राईव्ह यासारख्या प्लॅटफॉर्मवर बऱ्याचदा व्याकरणाशी संबंधित फीचर्स ऑफर केलेली आहे. एवढेच नाही तर तुम्ही दिलेल्या स्क्रिप्ट मध्ये किंवा वाक्यामध्ये काही विशिष्ट वाक्य दिलेली नसेल तरीही सर्च इंजिन यावर आधारित व्याकरणाबाबत सूचना देखील देऊ शकते. परंतु जर इनपुटने सर्च पॉलिसीचे उल्लंघन केल्यास हे टूल ऑपरेट होणार नाही. घातक, फसवणूक, वैद्यकीय, दहशतवादाशी संबंधित,हिंसक किंवा रक्तरंजित कंटेन चा समावेश यामध्ये केल्यास हे फीचर व्याकरण तपासण्याचे टाळते.