टाइम्स मराठी । सर्च इंजिन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या Google ने एक नवीन डोमेन लॉन्च केले आहे. एखादा व्यवसाय करण्यासाठी किंवा स्वतःची वेबसाईट डेव्हलप करण्यासाठी डोमेन नेम ची गरज पडते. हे डोमेन नेम विकत घेण्यासाठी बरेच पैसे भरावे लागतात. आतापर्यंत डोमेन नेम साठी एक लांब आणि युनिक नाव शोधावे लागत होते. त्यानंतर आपल्याला .com किंवा .co चा वापर करावा लागत होता. आता गुगलने एक नवीन डोमेन एक्सटेंशन टाईप .ing हे डोमेन नेम लॉन्च केले आहे. या डोमेन नेमच्या माध्यमातून तुम्ही ब्रँड किंवा व्यवसाय उभारण्यासाठी एकाच शब्दाचा वापर करून वेबसाईट तयार करू शकतात. म्हणजेच तुम्हाला आता लांब युनिक नेम शोधण्याची आता गरज पडणार नाही.
डोमेन रजिस्ट्रेशन सुरु
Google ने लॉन्च केलेल्या .ing प्रोग्राम साठी अर्ज देणे सुरु करण्यात आले आहे. यासाठी युजर्स ला काही पैसे पे करावे लागेल. ही फीस अवेलेबिलिटी च्या हिशोबाने कमी होत जाईल. हे डोमेन घेण्यासाठी युजर्स ला GoDaddy आणि 101 Domain यासारख्या पार्टनर कंपनीच्या माध्यमातून अद्वितीय डोमेन साठी रजिस्ट्रेशन करावे लागेल. रजिस्ट्रेशन साठी 5 डिसेंबर पर्यंत वेळ देण्यात आला आहे. यासोबतच 5 डिसेंबर नंतर हा प्रोग्राम रोलआऊट करण्यात येणार आहे.
स्पेशल डोमेन नेम साठी भरावे लागतील एवढे पैसे
जर तुम्ही .ing डोमेन वाले काही लोकप्रिय शब्द घेऊ इच्छित असाल तर त्यासाठी जास्त पैसे भरावे लागणार आहे. समजा तुम्ही think.ing , buy.ing या नावांचे रजिस्ट्रेशन करणार असाल तर तुम्हाला 32,49,999 रुपये आणि 1,08,33,332.50 रुपये ग्राहकांना प्रति वर्षाला भरावे लागेल. त्याचबरोबर तुम्ही kin.ing यासारख्या नावांचे शब्द घेणार असेल तर प्रति वर्ष 16,249.17 रुपये भरावे लागतील. आणि Dai.ing साठी 3,24,999 रुपये वर्षाला भरावे लागतील.
या पद्धतीने खरेदी करा डोमेन
1) GOdaddy, Namecheap, यासारख्या google Domains रजिस्टर जवळ जा.
2) त्यानंतर तुम्हाला हवा असेल तो .ing डोमेन निवडा.
3) या ठिकाणी तुम्हाला हवा तो डोमेन उपलब्ध असेल तर पैसे देऊन तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकतात.
4) तुम्ही डोमेन रजिस्टर केल्यानंतर तुम्ही या डोमेन चा वापर करू शकतात.
.ing सोबतच .meme हे डोमेन देखील केले लॉन्च
सध्या हे डोमेन फ्री रजिस्ट्रेशन साठी उपलब्ध आहे. 5 डिसेंबर नंतर या डोमेनचा वापर केला जाऊ शकतो. त्याचबरोबर 5 डिसेंबर नंतर डोमेन कमी किमतीमध्ये देखील उपलब्ध होऊ शकते. गुगलने .ing सोबतच .meme हे डोमेन देखील लॉन्च केले आहे. हे डोमेन फनी आणि मीन्म्स वेबसाईट साठी उपलब्ध करण्यात आले आहे.