Google ने लॉन्च केले Pixel कॅमेराचे नवीन व्हर्जन; या Mobile ला करेल सपोर्ट

टाइम्स मराठी । या महिन्याच्या सुरुवातीला गुगलने भारतात पहिल्यांदा तीन प्रॉडक्ट लॉन्च केले होते. त्यापैकी Pixel 8 आणि Pixel 8 Pro हे 2 स्मार्टफोन आहेत. गुगलच्या या नवीन स्मार्टफोनमध्ये गुगलने कॅमेरा ॲप उपलब्ध केले होते. आता गुगलने या दोन्ही स्मार्टफोनमध्ये पिक्सल कॅमेराचे नवीन व्हर्जन लॉन्च केले आहे. पूर्वीया पिक्सेल कॅमेरा ॲपचे नाव गुगल कॅमेरा ॲप असे होते. परंतु आता प्ले स्टोअर वर नाव बदलण्याची प्रक्रिया सुरू असून गुगलने या ॲपचे डिस्क्रिप्शन देखील बदलले आहे. त्यानुसार आता या ॲपला गुगलने पिक्सल कॅमेरा ॲप असं नाव दिलं आहे.

   

गुगलचं हे पिक्सेल कॅमेरा ॲप Android 14 आणि पिक्सेल डिवाइस वर चालणाऱ्या ऑपरेटिंग सिस्टीम वर काम करेल. सध्या हे ॲप पिक्सेल फोल्ड पिक्सेल टॅबलेट आणि पिक्सेल 7 प्रो यासारख्या स्मार्टफोनमध्ये देखील उपलब्ध आहे. त्याचबरोबर वेयर OS साठी पिक्सेल कॅमेराचे नवीन व्हर्जन उपलब्ध नसून फक्त पिक्सेल फोन मध्ये उपलब्ध असलेल्या वेअर OS 3 साठी हे अँप उपलब्ध आहे. लवकरच PIXEL 8 सिरीज साठी 9.1 वर्जन रोल आउट करण्यात येणार आहे.  पिक्सल कॅमेरा या ॲपमध्ये 50 मेगापिक्सल हाय रेस मोड आणि प्रो कंट्रोल यासारखे फीचर्स देण्यात आले आहे.

Google Pixel 8 आणि Pixel 8 pro या दोन्ही स्मार्टफोन मध्ये वेगवेगळे स्टोरेज व्हेरियंट देण्यात आले आहे. त्यानुसार Google Pixel 8 मध्ये 8 GB रॅम आणि 128 GB इंटरनल स्टोरेज उपलब्ध आहे. या मॉडेलची किंमत 75 हजार 999 आहे.Google pixel 8 या स्मार्टफोनच्या 256 GB स्टोरेज असलेल्या व्हेरीएंटची किंमत 82,999 रुपये आहे. Google Pixel 8 pro या स्मार्टफोनमध्ये 12 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज व्हेरीएंटची किंमत 1,06,999 रुपये आहे.