Google ने लाँच केले Gemini AI model; अशा पद्धतीने करेल काम  

टाइम्स मराठी । AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजंटबद्दल प्रत्येक ठिकाणी चर्चा सुरू आहे. आता बऱ्याच दिग्गज कंपन्यांनी AI मॉडेल लॉन्च केले असून ही स्पर्धा दिवसेंदिवस वाढत जात आहे. या स्पर्धेमध्ये गुगल देखील मागे नाही. कारण Google ने देखील आर्टिफिशियल इंटेलिजंटच्या स्पर्धेत उडी घेत Gemini AI लॉन्च केले आहे. हे गुगलचं ऍडव्हान्स आर्टिफिशल इंटेलिजंट मॉडेल आहे. कंपनीने लॉन्च केलेले हे मॉडेल बार्ड पेक्षा जास्त स्मार्ट असल्याचं गुगलने सांगितलं.

   

सर्व प्रकारचे टास्क करू शकते Gemini

Gemini AI हे मॉडेल डीप माईंड आणि गुगल रिसर्च टीमने मिळून डेव्हलप केले असून हे मॉडेल मानवी संवादाने प्रेरित आहे. म्हणजेच Gemini AI हे मॉडेल माणसं ज्याप्रमाणे एकमेकांसोबत संवाद साधतात त्याप्रमाणे डेव्हलप करण्यात आले आहे. त्यानुसार टेक्स्ट, इमेज, ऑडिओ, कोडिंग या सर्व प्रकारचे टास्क Gemini करू शकते.

तीन साईज मध्ये उपलब्ध होईल मॉडेल

कंपनीने लॉन्च केलेले हे मॉडेल तीन साईज मध्ये उपलब्ध होणार आहे. यामध्ये अल्ट्रा, प्रो आणि नॅनो हे तीन वर्जन असतील. अल्ट्रा व्हर्जन हे जटिल आणि गुंतागुंतीचे कार्य करण्यासाठी असेल. दुसरे मॉडेल हे प्रो व्हर्जन मध्ये असेल. प्रो व्हर्जन मध्ये असलेले मॉडेल अनेक कामे एकाच वेळी करण्यासाठी उपयोगी ठरेल. तिसरे मॉडेल म्हणजे नॅनो व्हर्जन. नॅनो व्हर्जनच्या माध्यमातून ऑन डिव्हाइस काम करता येऊ शकते.

गुगल असिस्टंट आणि बार्ड चे उपाध्यक्ष सीसी हसियाओ म्हणाले की, जेमिनी एआय हे मॉडेल बार्ड मध्ये दोन टप्प्यात लॉन्च करण्यात येणार आहे. त्यानुसार 6 डिसेंबर पासून बार्ड जेमिनी प्रो मध्ये एका स्पेशल व्हर्जनच्या मदतीने चालवण्यात येईल. ज्यामुळे  एखादी गोष्ट समजून घेणे, सारांश काढणे, तर्क करणे, कोडींग करणे आणि योजना आखणे या गोष्टींमध्ये बार्ड चॅटबॉट जास्त सक्षम होईल. यानंतर 2024 मध्ये  गुगल बार्ड ला अल्ट्रा व्हर्जन चा सपोर्ट मिळेल. या वर्जन मध्ये मल्टीमॉडेल रिझनिंग क्षमता असल्यामुळे जगातील सर्वात लोकप्रिय कोडींग लँग्वेज मध्ये हाय क्वालिटी कोड समजून घेण्यास मदत होईल. यासोबतच हे मॉडेल कोड समजावून सांगेल आणि नवीन कोड डेव्हलप करेल.

170 पेक्षा जास्त देशांमध्ये उपलब्ध होणार

 6 डिसेंबरला बार्ड मध्ये उपलब्ध करण्यात येणारे जेमिनी प्रो व्हर्जन सुरुवातीला टेक्स्ट प्रॉम्प्टला सपोर्ट करेल. त्यानंतर बार्ड मध्ये मल्टी मॉडेल सपोर्ट मिळेल. गुगल हे नवीन AI 170 पेक्षा जास्त देशांमध्ये उपलब्ध करणार आहे. सर्वात पहिले हे AI इंग्रजी भाषेमध्ये उपलब्ध असेल. त्यानंतर भविष्यात इतर भाषांचा सपोर्ट देखील मिळेल.