Google ने किशोरवयीन मुलांसाठी आणले नवीन AI चॅटबॉट; अभ्यास करण्यासाठी करेल मदत

टाइम्स मराठी । Google प्रत्येक एप्लीकेशन मध्ये आणि प्लॅटफॉर्म मध्ये AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजंट चा वापर करत आहे. गुगल सोबतच  बऱ्याच IT कंपनी, स्मार्टफोन मध्ये उपलब्ध असलेले वेगवेगळे ॲप्स  या सर्व गोष्टींमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजंट चा वापर करण्यास सुरुवात केली आहे. आता गुगलने जगभरातील किशोरवयीन मुलांसाठी  AI  लॅंग्वेज  मॉडेल, आणि बार्ड ला नवीन अवतारामध्ये लॉन्च केले आहे. जेणेकरून  या AI चॅटबॉटच्या मदतीने  सेक्युरिटी सोबतच अभ्यास करण्यास मदत होईल.

   

Google चे रिस्पॉन्सिबल AI चे प्रोजेक्ट हेड तुलसी दोशी यांनी ब्लॉक पोस्ट च्या माध्यमातून माहिती दिली. यावेळी ते म्हणाले की, कंपनी AI चॅटबॉट बार्ड ला संपूर्ण ग्राहकांसाठी ओपन करण्याची जबाबदारी वर लक्ष केंद्रित करत आहे. खास करून कंपनी तरुण आणि किशोरवयीन मुलांसाठी  AI चा वापर कशा पद्धतीने केला जाईल यावर लक्ष देत आहे. त्याचबरोबर कंटेंट नीती आणि सुरक्षा या गोष्टींची प्राथमिकता लक्षात घेता बाल सुरक्षा आणि डेव्हलपमेंट एक्सपर्ट च्या माध्यमातून कंपनी सल्ला घेत आहे.

हा आहे चॅटबॉट चा उद्धेश

AI चॅटबॉट च्या माध्यमातून किशोरवयीन मुलांना भाषण लिहिणे, गणिताच्या समस्या सोडवणे, नवीन स्किल्स शिकणे, मानसिक समज वाढवणे यासाठी मदत होईल. याशिवाय BARD ला किशोरवयीन मुलं प्रश्न विचारण्यासोबतच व्यक्तिगत गोष्टींबद्दल देखील मत मांडू शकतात. जेणेकरून  किशोरवयीन मुलांमध्ये कम्युनिकेशन करण्याची क्षमता वाढेल. असं गुगलने सांगितलं.

काय आहे हे BARD

BARD एक्सप्लोरेशन, शिकणे आणि समस्यांचे समाधान मिळवण्यासाठी वर्साटाईल टूल आहे. हे टूल किशोरवयीन मुलांना त्यांच्या जीवनात वेगवेगळ्या पैलूंवर नेविगेट करण्यासाठी मदत करेल. यासोबतच हे टूल आत्मविश्वास आणि सर्जनशीलता देखील वाढवेल. हे AI BARD मागच्या वर्षी लॉन्च करण्यात आले होते. हे ChatGPT प्रमाणेच ऑफिशियल चॅटबॉट आहे. या चॅटबॉटच्या माध्यमातून 18 वर्षांपेक्षा कमी वयाचे युजर्स देखील सुरक्षितरीत्या याचा वापर करू शकतात.हे चॅटबॉट वापरण्यासाठी पूर्णपणे सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे.