आता Internet शिवाय वापरा Google Map; कसे ते पहा

टाइम्स मराठी | आपण एखाद्या ठिकाणी प्रवास करणार असेल तर आपण अनोळखी ठिकाणी जाण्यासाठी गुगल मॅप चा वापर करतो. आणि या गुगल मॅप (Google Map) च्या सहाय्याने आपल्याला हव्या असलेल्या लोकेशनवर जातो. परंतु यासाठी आपल्या मोबाईल मध्ये इंटरनेट (Internet) सेवा उपलब्ध असणे गरजेचे असते. परंतु बऱ्याचदा फिरायला गेल्यावर नेटवर्क प्रॉब्लेम येतो. आणि त्यामुळे गुगल मॅप चालत नाही. आणि आपण अंदाजे रस्ता काढतो पण रस्ता चुकण्याची यामुळे मोठी भीती असते. यावर गुगल ने एक तोडगा काढला आहे. यामुळे तुम्ही आता इंटरनेट नसताना देखील गुगल मॅप वापरू शकतात.

   

गुगलने गुगल मॅप्स ऑफलाइन हे फीचर लॉन्च केले आहे. या फीचर च्या माध्यमातून तुम्ही एखाद्या ठिकाणचा रस्ता डाऊनलोड करून ठेवू शकतात. त्यामुळे हा रस्ता सेव राहील. आणि त्यामुळे तुम्हाला इंटरनेट किंवा मोबाईल नेटवर्क नसताना देखील गुगल मॅप रस्ता दाखवेल. परंतु यासाठी तुम्हाला प्रवासाला निघण्यापूर्वीच तुम्हाला रस्ता डाऊनलोड करून ठेवावा लागेल. आणि एकदा तिथे जाण्यापूर्वी तुम्हाला त्या ठिकाणचा मॅप देखील तुम्हाला हवा असेल तर तो देखील डाऊनलोड करून ठेवू शकता.

गुगल च्या या नव्या फिचर चा वापर करण्यासाठी खलील स्टेप्स वापरा

1) सर्वात अगोदर गुगल मॅप्स हे ॲप उघडावे लागेल.

2) त्यानंतर तुम्हाला हव्या असलेल्या लोकेशन चे नाव सर्च करा.

3) सर्च केल्यानंतर तुम्हाला मॅपच्या माध्यमातून रस्ता दिसेल. याखाली तुम्हाला एक ऍड्रेस बार दिसेल.

4) या ऍड्रेस बारवर क्लिक करा.

5) त्यानंतर more हे ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करा.

6) यानंतर डाऊनलोड ऑफलाइन मॅप या ऑप्शन वर क्लिक करून तुम्ही तुमचा मॅप डाउनलोड करू शकतात.

या व्यतिरिक्त तुम्ही ही देखील सेटिंग करू शकतात.

1) गुगल मॅप ओपन करा.

2) तुमच्या प्रोफाइल फोटोवर टॅप करा.

3) त्यानंतर ऑफलाइन मॅप हा ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करा.

4) यानंतर तुम्ही स्टार्टिंग पॉईंट आणि एन्ड पॉईंट निवडून विशिष्ट ठिकाणचा मॅप डाऊनलोड करू शकतात.