Google Maps मध्ये मिळणार Whatsapp मधील हे फीचर्स; यूजर्सना होणार फायदा

टाइम्स मराठी । मित्रानो, Android मोबाईल वर तुम्ही Google Map हे फीचर्स अनेकदा वापरलं असेल. जेव्हा आपण अनोळखी ठिकाणी प्रवास करतो तेव्हा तुमच्या डेस्टिनेशन पर्यंत पोचण्यासाठी गुगल मॅप तुम्हाला मदत करते. त्यामुळे गुगल मॅपच्या भरवश्यावर आपण कुठेही जाण्याची रिस्क घेऊ शकतो कारण आपल्याला रस्ता चुकण्याची भीती अजिबात नसते. गुगल मॅप सुद्धा आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन फीचर्स घेऊन येत असत. आताही कंपनीने एक नवं फीचर्स लाँच केलं आहे. हे फीचर्स यापूर्वी तुम्ही whatsapp मध्ये बघितलं असेलच. आता गुगल मॅपच्या माध्य्मातून तुम्ही तुमचं लाइव्ह लोकेशन शेअरिंग करू शकणार आहात. कसे ते जाणून घेऊया.

   

या नव्या फिंचरची मागणी गेल्या काही दिवसांपासून केली जात होती. अखेर कंपनीने लाइव्ह लोकेशन शेअरिंग फीचर्स उपलब्ध केला आहे. सध्या तरी फक्त अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी हे फीचर्स उपलब्ध करण्यात आलं आहे. त्यामुळे WhatsApp प्रमाणे गुगल मॅप चे यूजर्स सुद्धा रिअल टाइम लोकेशन इतर कोणाशीही शेअर करू शकतील. यासाठी तुम्हाला कोणतेही वेगळे अॅप डाउनलोड करण्याची गरज नाही.

या स्टेप्स फॉलो करून घ्या लाभ

तुम्हाला गुगल मॅप्सवर कोणालाही रिअल-टाइम लोकेशन शेअर करायचे असल्यास, अॅपमधील तुमच्या प्रोफाइलवर जावा
यानंतर लोकेशन शेअरिंगच्या पर्यायावर क्लिक करा.
आता तुम्हाला तुमचे लोकेशन किती वेळेसाठी शेअर करायचे आहे हे विचारले जाईल.
यानंतर ज्या व्यक्तीला तुम्हाला लोकेशन शेअर करायचे आहे तो कॉन्टॅक्ट निवडा.
त्यानंतर तुम्ही व्हॉट्सअॅपसारख्या अॅप्सवर गुगल मॅप्सचे लोकेशन शेअर करू शकाल.
लोकेशनवर क्लिक मारल्यानंतर लोकेशन शेअर आपोआप थांबेल.
लोकेशन शेअरिंगसह, तुम्ही बॅटरीची टक्केवारी आणि चार्जिंगची स्थिती (फोन चार्ज होत असल्यास) सुद्धा पाहू शकाल.